माउलींच्या आगमनाची बरडकरांना उत्सुकता!

शशिकांत सोनवलकर
मंगळवार, 27 जून 2017

दुधेबावी - संत ज्ञानेश्वर महाराज माउलींच्या स्वागतासाठी बरडनगरी सज्ज झाली आहे. फलटण येथील आजचा मुक्काम आटोपून उद्या बरड (ता. फलटण) येथे पालखी मुक्कामी येणार आहे त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी केली आहे. माउलींच्या आगमनाची बरडकरांना उत्सुकता! पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी पाच ठिकाणी टॅंकर भरण्यासाठी व्यवस्था केली आहे. वारी मार्गावर तसेच मुक्कामाच्या ठिकाणी शौचालयांचे सातशे सीटस्‌ उभारण्यात आले आहेत. तेथे लाईट व्यवस्था करण्यात आली आहे. २०१३ सालचा पावसाचा अनुभव लक्षात घेऊन पालखी सोहळ्यात विशेष काळजी घेण्यात येत आहे. पालखी तळ टणक व मजबूत केला असून दोन वीज टॉवर उभारले आहेत.

दुधेबावी - संत ज्ञानेश्वर महाराज माउलींच्या स्वागतासाठी बरडनगरी सज्ज झाली आहे. फलटण येथील आजचा मुक्काम आटोपून उद्या बरड (ता. फलटण) येथे पालखी मुक्कामी येणार आहे त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी केली आहे. माउलींच्या आगमनाची बरडकरांना उत्सुकता! पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी पाच ठिकाणी टॅंकर भरण्यासाठी व्यवस्था केली आहे. वारी मार्गावर तसेच मुक्कामाच्या ठिकाणी शौचालयांचे सातशे सीटस्‌ उभारण्यात आले आहेत. तेथे लाईट व्यवस्था करण्यात आली आहे. २०१३ सालचा पावसाचा अनुभव लक्षात घेऊन पालखी सोहळ्यात विशेष काळजी घेण्यात येत आहे. पालखी तळ टणक व मजबूत केला असून दोन वीज टॉवर उभारले आहेत. ५० वीजदिव्यांद्वारे लाईटची व्यवस्था केली आहे. आरोग्य विभागामार्फत पाणीपुरवठ्याचे सर्व स्त्रोत निर्जंतुक करण्यात आले आहेत. पालखी तळाकडे जाणारे रस्ते मुरमीकरण केले आहे. गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव विशेष लक्ष ठेवून आहेत. 

महसूल प्रशासनाकडून गॅस व रॉकेल उपलब्ध करून दिले आहे. पोलिस प्रशासनाने वॉच टॉवर व तंबू उभारले असून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्‍यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे पोलिस उपनिरीक्षक बी. एन. बुरशे यांनी सांगितले.

वैष्णवांच्या मेळ्यासाठी बरडच्या ग्रामपंचायतीचे कर्मचारी, ग्रामस्थ विशेष परीश्रम घेत आहेत. वारकरी, भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली आहे.
- संजयकुमार बाचल, प्रशासक, बरड ग्रामपंचायत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dnyaneshwar Palkhi 2017 barad phaltan