#SaathChal हिरा गेला राजा आला   

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 July 2018

पुणे : पंढरीच्या वारीत गेली आठ वर्षे माऊलींची सेवा करणारा "हिरा' हा अश्‍व रविवारी अचानक दगावला. पहाटे पाच वाजता भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिर परिसरात घडली. मात्र, पर्यायी व्यवस्था म्हणून शितोळे सरकार यांच्या तर्फे राजा हा अश्‍व माऊलींच्या सेवेत रुजू झाला आहे. येथून पुढच्या प्रवासात आता "राजा' माऊलींच्या चरणी सेवा रुजू करेल. 

"हिरा' दगावल्याने आळंदी देवस्थानच्या विश्‍वस्तांसहीत भाविकांनी हळहळ व्यक्त केली. विश्‍वस्त विश्‍वास ढगे म्हणाले,""हिराने आठ वर्षे माऊलींची सेवा पालखी सोहळ्यात केली. सेवेतच त्याला माऊलींच्या चरणी विलिन होण्याचे भाग्य लाभले. ही बातमी समजल्यावर शितोळे सरकार यांच्याकडे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. राजा नावाचा अश्‍व येथून पुढे माऊलींच्या सेवेत असेल. मात्र तत्पूर्वी माऊलींच्या पादुकांसमोर त्याला उभे करून त्यांचे पूजन करून त्याला सेवेत रुजू करण्यात येईल. ''  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hira the horse of dnyaneshwar palkhi died today