लोणंदनगरीत माउलींचा जयघोष

रमेश धायगुडे
Sunday, 25 June 2017

पालखीचे उत्साहात स्वागत; पादुकांना नीरा नदीत स्नान

लोणंद - श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज दुपारी १.३९ वाजता पाडेगाव (ता. खंडाळा) येथे जिल्ह्यात आगमन झाले आणि त्याचबरोबर दिंड्या-पताकांची दाटी... न उरली भेदभावाची ताटी, असेच काहीसे वातावरण निर्माण होऊन जो तो विठ्ठल नामाच्या गजरात, भक्तिभावात दंग झाला. त्या वेळी जिल्ह्याच्या वतीने पालखी सोहळ्याचे उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. 

नीरा (ता. पुरंदर) येथील विसावा आटोपून पालखी सोहळा दुपारी एक वाजता लोणंदकडे येण्यासाठी निघाला. नीरा नदीच्या जुन्या पुलावरून पालखी रथ नीरा नदीच्या अलीकडील तीरावर येताच माउलींच्या पादुका आळंदीपासूनच्या वाटचालीत प्रथमच पालखी रथातून बाहेर काढण्यात आल्या. पालखी सोहळ्याचे मालक राजाभाऊ आरफळकर, सोहळा प्रमुख अभय टिळक, प्रमुख विश्‍वस्त डॉ. अजित कुलकर्णी व अन्य पुजाऱ्यांच्या 
हस्ते नीरा नदीतील दत्त घाटावर नेऊन तेथे

चांदोबाचा लिंब येथे आज उभे रिंगण
वारकऱ्यांच्या आगमनाने लोणंदनगरी माउलीमय झाली आहे. सर्वत्र दिंड्या व वारकऱ्यांना अन्नदान व अन्य सर्व प्रकारच्या सेवा पुरवण्याची सर्वच यंत्रणाची लगबग सुरू आहे. उद्या (ता. २५) रोजी दुपारी दीड वाजता पालखी तरडगाव मुक्कामासाठी प्रस्थान ठेवणार आहे. तत्पूर्वी चांदोबाचा लिंब येथे पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण होणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lonand news sant dnyaneshwar maharaj palkhi sohala