esakal | पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल
sakal

बोलून बातमी शोधा

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज पालख्यांचे आज पुण्यनगरीत आगमन

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज पालख्यांचे पुण्यात रविवारी (ता. 18) आगमन होत असून, दोन दिवसांच्या मुक्कामानंतर त्या प्रस्थान करतील. या पालखी सोहळ्यानिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल केले आहेत. हे बदल रविवार ते मंगळवार (ता. 20)पर्यंत राहतील. वाहनचालकांनी पालखीमार्गांवर वाहने आणू नयेत, तसेच पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

अ) वाहतुकीसाठी बंद असलेले रस्ते (संत तुकाराम महाराज पालखी) :
संत तुकाराम महाराज पालखीनिमित्त रविवारी पहाटे चार वाजल्यापासून पालखी मुक्‍कामाच्या ठिकाणी पोचेपर्यंत विठ्ठल मंदिर आकुर्डी ते श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर, नाना पेठपर्यंत रस्ते वाहतुकीस बंद राहतील.

देहू फाटा ते भक्‍ती-शक्‍ती चौक ते नाशिक फाटा चौक, पिंपरी पूल ते अहल्यादेवी चौक, पालखी अहल्यादेवी चौकात आल्यानंतर पिंपरी पूल ते पिंपरी चौक, नेहरूनगर ते एचए कॉर्नर, खराळवाडी ते संत तुकारामनगर, पालखी वल्लभ चौकात आल्यानंतर एचए कंपनीजवळ भुयारी मार्ग आणि नेहरूनगर ते डी. वाय. पाटील रस्ता बंद राहील. पालखी संत तुकारामनगर ते नाशिक फाटा येथे पोचेपर्यंत पालखी ग्रेड सेपरेटरच्या डाव्या बाजूने जाईल. नाशिक फाटा ते चर्च चौक, पालखी इंजिनिअरिंग कॉलेज चौकात पोचेपर्यंत चर्च चौक ते इंजिनिअरिंग कॉलेज चौकात वाहतूक बंद राहील.

ब) वाहतुकीसाठी बंद असलेले रस्ते (संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी) :
संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी रविवारी आळंदी दिघी मॅगझीन येथून विश्रांतवाडी, साप्रस चौकी, चंद्रमा हॉटेल चौक, डावीकडे वळून सादलबाबा चौक, उजवीकडे वळून संगमवाडी नवीन रस्त्याने पाटील इस्टेट चौक, डावीकडे वळून इंजिनिअरिंग कॉलेज चौकात जाईल. पालखीनिमित्त रविवारी पहाटे तीन वाजल्यापासून रस्ते वाहतुकीसाठी बंद राहतील. दिघी मॅगझीन ते आळंदी, वडमुखवाडी ते आळंदी रस्ता, पांजरपोळ चौक ते भोसरी, कळस फाटा ते विश्रांतवाडी चौक, सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट रस्ता, होळकर पूल ते चंद्रमा चौक ते साप्रस चौकीपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील. या कालावधीत केवळ आळंदीकडे जाणारे रस्ते बंद राहणार असून, इतर रस्ते वाहतुकीसाठी खुले राहतील.

क) शहरात दोन्ही पालख्यांचा एकत्रित मार्ग :
दोन्ही पालख्या पुणे- मुंबई रस्त्याने रविवारी इंजिनिअरिंग कॉलेज चौक, संचेती चौक, सिमला चौक, वीर चाफेकर चौक, डावीकडे वळून फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याने ज्ञानेश्‍वर पादुका चौक, तुकाराम पादुका चौक, गुडलक चौक, खंडोजीबाबा चौक, टिळक चौक, लक्ष्मी रस्त्याने विजय टॉकीज चौक, सेवासदन चौक, बेलबाग चौक, बुधवार चौक, पासोड्या विठोबा मंदिर, मोती चौक, सोन्या मारुती चौक, हमजेखान चौक, डुल्या मारुती चौक, नाना पेठ पोलिस चौकीजवळ आल्यानंतर संत तुकाराम महाराज पालखी अरुणा चौकमार्गे निवडुंगा विठोबा मंदिरात, तसेच संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी अशोक चौकमार्गे पालखी विठोबा मंदिर येथे मुक्‍कामी राहील.

ड) जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन आणि लक्ष्मी रस्ता बंद :
शहरात दोन्ही पालख्यांचे आगमन रविवारी होणार असून, दुपारी 12 वाजल्यापासून आवश्‍यकतेनुसार रस्ते वाहतुकीसाठी बंद केले जाणार आहेत. दोन्ही पालख्या सीओईपी चौकातून मुक्कामाच्या ठिकाणी जातील, त्यामुळे संचेती चौकापासून जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता आणि लक्ष्मी रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील. सोमवारी दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी राहतील. मंगळवारी सकाळी दोन्ही पालख्या सोलापूर रस्त्याने प्रस्थान करतील. या वेळेत सोलापूर रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

शहरातील वाहतुकीसाठी बंद असलेले रस्ते आणि कंसात पर्यायी मार्ग...
1) इंजिनिअरिंग कॉलेज ते तुकाराम पादुका चौक :

 • - गणेशखिंड रस्ता, रेंजहिल चौक ते संचेती चौक : (रेंजहिल रस्ता- खडकी पोलिस ठाणे भुयारी मार्ग- पोल्ट्री चौक- जुना मुंबई- पुणे महामार्ग. रेंजहिल- सेनापती बापट रस्ता- नळ स्टॉप चौक).
 • - फर्ग्युसन रस्ता, खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक : (खंडोजीबाबा चौक - कर्वे रस्ता- सेनापती बापट रस्ता- रेंजहिल).
 • - शिवाजी रस्ता, शनिवारवाडा ते स. गो. बर्वे चौक : (प्रीमियर गॅरेज चौक- पुणे महापालिका- झाशी राणी चौक- बालगंधर्व पूलमार्गे खंडोजीबाबा चौक. तसेच, गाडगीळ पुतळा चौक- कुंभारवेस- आरटीओ चौक-
 • - शनिवारवाडा - केळकर रस्ता- शास्त्री रस्ता -सिंहगड रस्तामार्गे इच्छितस्थळी जाता येईल).
 • - वीर चाफेकर चौक ते वाकडेवाडी भुयारी मार्ग : (रेंजहिलमार्गे किंवा औंधमार्गे).
 • - कुंभार वेस चौक ते गाडगीळ पुतळा चौक, मालधक्‍का ते शाहीर अमर शेख चौकापर्यंत : (कुंभारवेस- पवळे चौक- फडके हौद चौक. तसेच मालधक्‍का चौक - नरपतगीर चौक- 15 ऑगस्ट चौक- कमला नेहरू रुग्णालय).

2) तुकाराम पादुका चौक ते बेलबाग चौक :

 • टिळक रस्ता- पुरम चौक ते अलका टॉकीज चौक - (विश्‍व हॉटेल- ना. सी. फडके चौक- शास्त्री रस्ता- सेनादत्त चौकी- म्हात्रे पूल- नळ स्टॉप).
 • लक्ष्मी रस्ता- बेलबाग चौक ते टिळक चौक- (शिवाजी रस्ता ते गोटीराम भैया चौक- राष्ट्रभूषण चौक- हिराबाग चौक- विश्‍व हॉटेल- म्हात्रे पूल- नळ स्टॉप).
 • शिवाजी रस्ता- जिजामाता चौक ते बुधवार चौक ते बेलबाग चौक - (फुटका बुरूज- गाडगीळ पुतळा- नदीपात्रातील रस्ता. तसेच, जिजामाता चौक ते फडके हौद चौक).
 • लक्ष्मी रस्ता- संत कबीर चौक ते बेलबाग चौक - (संत कबीर चौक- रास्ता पेठ चौक- सेव्हन लव्हज चौक).

3) बेलबाग चौक ते निवडुंगा विठोबा मंदिर किंवा पालखी विठोबा मंदिर :

 • लक्ष्मी रस्ता- बेलबाग चौक ते सेवासदन चौक- (बेलबाग चौक- रामेश्‍वर चौक- शनिपार चौक- बाजीराव रस्त्याने इच्छितस्थळी). देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक- (गणेश रस्ता- फडके हौद चौकमार्गे).
 • रामोशी गेट ते पालखी विठोबा मंदिर - (नेहरू रस्ता).

पर्यायी रस्ते

 • - मुंबईकडून सोलापूरकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता : तळेगाव येथून इंदुरी, चाकण, शिक्रापूर, केसनंद, कोलवडी, थेऊरमार्गे सोलापूर किंवा देहूफाट्यापासून कात्रज बायपासने कात्रज जकात नाका, सातारा रस्त्याने कापूरहोळमार्गे नारायणपूर, सासवड बाहेरून मोरगाव, सुपा, चौफुलामार्गे सोलापूर.
 • - मुंबईकडून नगरकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता : तळेगाव येथून इंदुरी, चाकण, शिक्रापूर, वाघोलीमार्गे नगर.
 • - साताऱ्याकडून नगरकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता : कापूरहोळमार्गे नारायणगाव, सासवड, जेजुरी, मोरगाव, सुपा, चौफुला, केडगाव, पारगाव न्हावरे गाव फाटा ते नगर रस्ता.
 • - पुण्याकडून सासवडकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता : कात्रज- सातारा रस्त्याने कापूरहोळ, नारायणगावमार्गे सासवड. तसेच, गोळीबार मैदान, कोंढवा, लुल्लानगर, बोपदेव घाटमार्गे सासवड.

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक :
वाहतूक मुख्य नियंत्रण कक्ष
दूरध्वनी क्रमांक - 020- 26122000, 26208225