#SaathChaal पंढरपूर सायकवारीत दृष्ट्रीहीन सायकलिस्ट 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 July 2018

नाशिक : नाशिक सायकलिस्ट असोसिएशनतर्फे उद्या (ता.12) पंढरपूर सायकलवारी निघणार आहे. त्यात, यंदा प्रथमच प्रसाद उत्तेकर हा दिव्यांग युवक नाशिक ते 
पंढरपूर सायकल प्रवास करणार आहे. 

नाशिक : नाशिक सायकलिस्ट असोसिएशनतर्फे उद्या (ता.12) पंढरपूर सायकलवारी निघणार आहे. त्यात, यंदा प्रथमच प्रसाद उत्तेकर हा दिव्यांग युवक नाशिक ते 
पंढरपूर सायकल प्रवास करणार आहे. 

मुंबईतील रहिवाशी असलेले प्रसाद उतेकर (वय27) हा युवक गेली अनेक वर्षापासून सायकलचा चाहता आहे. नॅब संस्थेत पेपर डिझाईनचे काम करणारा प्रसाद डॉक्‍टर मनीषा रौंदळ यांच्यासोबत टेन्दम सायकलवर नाशिक ते पंढरपुर वारी करणार असून वारीत नेत्रदानाचा संदेश देणार आहे.नाशिकला तो एका सामाजिक उपक्रमासाठी आला असतांना डॉ मनीषा रौंदळ यांच्याशी झालेल्या ओळखीतून त्याने सायकल वारीत सहभागाची इच्छा दर्शविली. डॉ.रौंदळ यांनी या वर्षाच्या सायकल वारीत दृष्ट्रहीन वारकरी सध्या नाशिकला "टेन्दम सायकल' वर डॉक्‍टर मनीषा यांच्या बरोबर एकाच वेळी पॅडल मारणे,तोल सांभाळणे या गोष्टीचा सराव करतो. 

आज शुभारंभ नगरला विसावा 
नाशिकहून 13 जुलैला निघून 15 जुलैला पंढरपूरला पोहोचणारी ही रॅली उद्या नगरला विश्रांती घेणार आहे.शिक्षण ,आरोग्य,प्लास्टिक मुक्ती,पर्यावरणाचा जागर होणार आहे. संकल्पनेतून सौर उर्जेवर चालणारा रथ तयार केलेला आहे.रॅलीत 8 ते 70 वयोगटातील पाचशेवर सायकल वारकरी असतील. रॅलीत सायकलिस्ट प्लास्टिक पिशवीत खाद्य पदार्थ किंवा पाण्याची प्लास्टीक बाटली वापरणार नाहीत. वैद्यकीय पथक, सायकल पंक्‍चर काढण्यासाठी चार व्हॅनची व्यवस्था आहे. 

असा असेल प्रवास 
शुक्रवारी 13 जुलैला सकाळी सहाला गोल्फ क्‍लब मैदानावरून निघून नाशिक रोडला काही वेळ थांबून सिन्नरला चहा अल्पोहाराची सोय असेल. सिन्नरला 50 सायकलीस्ट 
सहभागी होतील. त्यानंतर प्रत्येक पंधरा ते वीस किलोमीटर वर अंतरावर हि वारी थांबेल. पहिल्या दिवशी 160 किमी नगरला हि सायकल वारी पोहोचेल. दुसऱ्या दिवशी 
सकाळी सहाला निघून टेंभुर्णीला मुकाम करेल. तिसऱ्या दिवशी पंढरपूरला दुपारी एकला पोहोचून दर्शनानंतर दुपारी चारला वारी माघारी फिरेल. 

मला सायकलची खूप आवड आहे. फिटनेस सोबतच पर्यावरण, नेत्रदानाचा संदेश या वारीतून द्यायचा आहे. दृष्ट्रीहीन असूनही सायकल वारीत सहभागाची संधी मिळाल्याने 
बंद डोळ्यांनी मी वारी अनुभवणार आहे. नाशिक सायकलीस्ट व मनीषा रौंदळ यांचे सहकार्य लाभले. 
-प्रसाद उतेकर (दृष्ट्रीहीन सायकलीस्ट) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news vari in participant parcelly blind