घुमे गजर हरिनामाचा, भक्त नामात रंगला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

सिन्नर - दिंडी चालली, चालली विठ्ठलाच्या दर्शनाला, घुमे गजर हरिनामाचा, भक्त नामात रंगला! अशा अभंगात दंग झालेल्या वारकऱ्याच्या टाळ-मृदंगाच्या जयघोषात संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या पालखीचे आज सिन्नर तालुक्‍यात आगमन झाले. नाशिक-पुणे महामार्गावरून दिंडीचा पास्ते घाटातून जामगावमार्गे लोणारवाडीला आज मुक्काम असणार आहे. 

दिंडीच्या स्वागताच्या तयारीची लगबग लोणारवाडीत तीन दिवसांपासून सुरू असते. रात्रीच्या मुक्कामाच्या संपूर्ण दिंडीतील वारकऱ्यांच्या जेवणाची तयारी ग्रामस्थांकडून करण्यात येते. घरोघरी पुरणपोळ्या व गुळवणी, रस्सा व भाताची मेजवानी असते. प्रत्येक घरातून पालखीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना जेवण दिले जाते. रात्रभर कीर्तनाच्या कार्यक्रमात ग्रामस्थांसह दिंडीतील वारकरीही तल्लीन होतात. लोणारवाडीतील विठ्ठल मंदिरासमोर आज दिंडीचा मुक्काम असून, सकाळी सिन्नर शहरातून दातली येथील रिंगण करून खंबाळे (ता. सिन्नर) येथे मुक्कामी जाणार आहे.

वारकऱ्यांचा जयघोष
नाशिकसह जिल्‍ह्यात माॅन्सूनचे आगमन झाल्‍याचे संत निवृत्तिनाथांच्या दिंडीतील वारकऱ्यांना समजल्‍यावर वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. आनंदाच्या भरात वारकऱ्यांनी संत निवृत्तिनाथ, पांडुरंगाचा जयघोष केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news nivruttinath maharaj