निवृत्ति सप्रेम जोडती सर्व काळ,  पंढरी ये राम विश्रामले...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

नाशिक रोड - निवृत्ति सप्रेम जोडती सर्व काळ, पंढरी ये राम विश्रामले... निवृत्तिनाथ महाराजांच्या अशा अभंगांचे स्मरण करीत तसेच रामकृष्ण हरी, निवृत्तिनाथ महाराज की जय, अशा जयघोषाने त्र्यंबकेश्‍वरहून पंढरपूरकडे जाणाऱ्या निवृत्तिनाथ महाराज पालखीचे आज दुपारी नाशिक रोडला आगमन झाले. या वेळी विविध पक्ष, संघटनांनी पालखीचे स्वागत केले. मुक्तिधाम मंदिरात विधिवत पूजन होऊन दुपारी तीनला पालखीचे पुढे प्रस्थान झाले. 

तत्पूर्वी वारकऱ्यांच्या प्रचंड उत्साहात व जल्लोषात काल (ता. १०) संत निवृत्तिनाथ महाराजांची पालखीचे नाशिकमध्ये आमगन झाले. जुन्या नाशिकमधील काजीपुऱ्यातील संत नामदेव विठ्ठल मंदिरात पालखीचा मुक्काम होता. नंतर दिंडी जुन्या नाशिकमधील नामदेव विठ्ठल मंदिरात पोचली. आज काकडा आरतीनंतर हरिपाठाचे वाचन झाले. नंतर वारकऱ्यांना सोमवार पेठेतील अहिर सुवर्णकार मंगल कार्यालयात भोजन देण्यात आले. सकाळी साडेदहाला पालखीचे पळसे गावाकडे प्रयाण झाले.  निवृत्तिनाथ महाराज पालखीचे नाशिक रोडला दुपारी एकच्या सुमारास आगमन झाले. हातात भगवे ध्वज, डोक्‍यावर तुळशीची रोपे व जलकलश घेतलेल्या महिला व पुरुष संत निवृत्तिनाथाचे नामस्मरण, अभंग म्हणत सहभागी झाले. मुक्तिधाममध्ये पालखी येताच चौहान कुटुंबाने चांदीच्या रथात असेलला श्रींचा मुखवटा व पादुका डोक्‍यावर घेऊन मंदिरात प्रवेश केला. तेथे जगदीश चौहान, आदित्य चौहान व खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते आरती झाली. संस्थानचे अध्यक्ष संजय महाराज धोंगडे, माजी अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, पुंडलिक थेटे, पद्माकर पाटील, राजाभाऊ कुलकर्णी आदी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news wari news PandharichiWari