श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी साडेअकरा तास पाळीत 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 June 2017

पंढरपूर - आषाढी यात्रेनिमित्ताने येणारे आणि शनिवार, रविवार आणि सोमवारी ईद अशा तीन दिवसांच्या सुट्यांमुळे आलेल्या भाविकांमुळे दोन दिवस येथे गर्दी वाढली होती. आज तुलनेने गर्दी काहीशी कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तरीही आज (मंगळवारी) श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी साडेअकरा तास लागत होते. 

जवळ आलेली आषाढी यात्रा आणि सलग तीन दिवस आलेल्या सुट्यांमुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहरात भाविकांची गर्दी वाढली होती. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग स्मशानभूमीपर्यंत जात होती. आज दर्शन रांग कमी होऊन विप्रदत्त घाटाच्या काहीशी पुढे पर्यंत गेली होती. आज सकाळी साडेदहा वाजता श्री विठ्ठल मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलेल्या भरत ज्ञानू माटे (रा. कुंभारगाव, ता. पाटण, जि. सातारा) यांना विचारले असता ते म्हणाले, काल (ता. 26) रात्री अकराच्या सुमारास स्मशानभूमी शेजारील एक नंबरच्या शेडपासून रांगेत उभा राहिलो होतो. साडेअकरा तासानंतर दर्शन झाले. दर्शन रांगेत व्यवस्था चांगली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpur Wari 2017 pandharpur