तुकाराम महाराज पालखी मार्गावर वाहतुकीचा बोजवारा

रमेश वत्रे
Friday, 23 June 2017

केडगाव : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गावर यंदा वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. सोहळा चालू असताना येणारी जड वाहने थांबविण्याची मागणी वारक-यांकडून होत आहे.  

केडगाव : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गावर यंदा वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. सोहळा चालू असताना येणारी जड वाहने थांबविण्याची मागणी वारक-यांकडून होत आहे.  

पालखीसाठी महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविल्यानंतर पोलिसांकडून स्थानिक वाहनांची अडवणूक केली जाते. तर काही ठिकाणी जड वाहतूक सोहळ्यातून जात असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र पुणे सोलापूर महार्मावर आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक 
विश्वास नांगरेपाटील यांनी संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावर सायकलवर फिरून सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेची पाहणी केली. नांगरेपाटील यांनी या मार्गावरही लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

पालखी सोहळा चालू असताना त्या मार्गावरून सोहळयाच्या बाहेरील वाहने सोडली जात नाहीत. जड वाहनांना कित्येक किलोमीटरवर दूरवर थांबविण्याचे आदेश असतात. न थांबणा-या वाहनांसाठी दूरवरचा पर्यायी मार्ग काढलेला असतो. सार्वजनिक वाहतूक करणा-या एसटी बसही या नियमातून सुटत नाही. यंदा मात्र लाखो वारकरी सोलापूर मार्गावरून जात असताना जड 
वाहतूकही अधून मधून जाताना दिसत आहे. याचा त्रास पायी चालणा-या वारक-यांना आणि स्थानिक भाविकांना दर्शन घेताना होत आहे. ही वाहतूक पोलिसांच्या समोरून जात असताना पोलिस बघ्याची भूमिका घेत आहेत. याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pandharpur wari 2017 tukaram maharaj palkhi 2017 traffic