साहित्यिकांची निघाली पहिल्यांदाच देहू ते निगडी साहित्य प्रबोधन दिंडी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 June 2017

पिंपरी - 
""गर्जो हरिचे पवाडे । मिळो वैष्णव बागडे । 
पाझर रोकडे । काढू पाषाणामध्ये ।।''
या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील भक्तिभाव विठुरायाच्या ओढीने पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या डोळ्यात ओथंबत होता. हाच भाव घेऊन साहित्यिकांनी शनिवारी संत तुकाराम महाराज पालखीसोबत पहिल्यांदाच "साहित्य प्रबोधन दिंडी' काढून वेगळ्या उपक्रमाला सुरवात केली. 

देहू ते निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यान चौकापर्यंत ही साहित्य प्रबोधन दिंडी निघाली. मुखाने सुरू असलेला "ज्ञानोबा-तुकाराम'चा गजर, वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झालेले साहित्यिक, डोक्‍यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झालेल्या कवयित्री असा वेगळाच थाट पाहण्यास मिळाला. साहित्य संवर्धन समिती आणि पिंपरी-चिंचवड साहित्य मंच यांनी संयुक्तपणे हा उपक्रम घेतला. साहित्यिक राजेंद्र घावटे, सुरेश कंक, अरविंद वाडकर, सुहास घुमरे, मुरलीधर दळवी, उमेश सणस, नंदकिशोर आवारी, विनिता माने-पिसाळ, सुमन दुबे आदींनी त्यामध्ये सहभाग घेतला. 

सकाळी देहू येथील इनामदारवाड्यापासून संत तुकाराम महाराज पालखी मार्गस्थ झाल्यानंतर त्यामध्ये साहित्यिक सहभागी झाले. निगडी येथे महानगरपालिकेतर्फे पालखीचे स्वागत झाले. तिथेच साहित्य प्रबोधन दिंडीचा प्रवास संपला. 

"" या उपक्रमाच्या माध्यमातून संत तुकाराम, संत ज्ञानेश्‍वर, संत एकनाथ महाराज तसेच कवी कुसुमाग्रज यांच्यापासून ते थेट कामगार कवी नारायण सुर्वे यांच्या कालखंडापर्यंतच्या विविध नामवंत साहित्यिकांनी संत साहित्याच्या दृष्टीने केलेल्या अभ्यासाचा परामर्श घेणार आहोत.'' 
- सुरेश कंक, अध्यक्ष, साहित्य संवर्धन समिती. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri news wari litterateur wari pandharichi wari