दिंड्यांना स्वस्त धान्य, सिलिंडर 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 June 2017

पुणे - पालखीत सहभागी दिंड्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून तब्बल 400 तात्पुरते रेशन कार्ड तयार करण्यात आले आहेत. तसेच ज्या दिंडीप्रमुखांनी 

स्वतंत्र बॅंक खात्याशी आधार लिंकिंग केले आहे, त्यांना अनुदानित गॅस सिलिंडर वितरणाची व्यवस्था केली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. 

पुणे - पालखीत सहभागी दिंड्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून तब्बल 400 तात्पुरते रेशन कार्ड तयार करण्यात आले आहेत. तसेच ज्या दिंडीप्रमुखांनी 

स्वतंत्र बॅंक खात्याशी आधार लिंकिंग केले आहे, त्यांना अनुदानित गॅस सिलिंडर वितरणाची व्यवस्था केली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. 

पंढरपूर आषाढी वारीमध्ये सहाशेहून जास्त दिंड्या सहभागी होतात. त्यांच्या दैनंदिन अन्नाच्या सुविधेसाठी पुणे जिल्ह्यात 400 तात्पुरते रेशन कार्ड तयार करण्यात आले आहेत. दिंड्या ज्या तालुक्‍यातून जातील तेथील स्वस्त अन्नधान्य वितरकांकडून साखर, रॉकेल घेता येईल. त्यासाठी जवळपास 2 हजार 50 लिटर रॉकेलचा साठा राखून ठेवण्यात आला आहे, तर हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत गॅस आणि इंडियन ऑइल कंपन्यांकडे 20 हजार 600 गॅस सिलिंडरची मागणी करण्यात आली आहे. अनुदानित सिलिंडरचे अनुदान दिंडीच्या बॅंक खात्यात जमा केले जाईल, अशी माहिती जिल्हा अन्नधान्य वितरण विभागाच्या वतीने देण्यात आली. या बैठकीमध्ये गॅस कंपन्यांचे अधिकारीदेखील उपस्थित होते. 

पोलिसांची स्वतंत्र कुमक 
शहर आणि ग्रामीण पोलिसांकडून पालखी सोहळ्यासाठी स्वतंत्र कुमक मागविण्यात येणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून पालखी सोहळ्यादरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार, तडीपारांना ताब्यात घेतले जाणार आहे. बॉंब शोधपथक, वाहतूक पोलिसांची जादा कुमक, तात्पुरती सीसीटीव्ही यंत्रणा, नियंत्रण कक्ष आणि पोलिसांसाठी विश्रांतीगृहांची व्यवस्था केली आहे. तसेच नदी, तलाव येथे विजेची सुविधा, आरोग्य सुविधा, सर्पदंश  प्रतिबंधक लसीची उपलब्धता, पालखी मार्गांवरील अतिक्रमणे हटविणे; तसेच बॅरिकेड खरेदीसाठी विशेष निधीची मागणी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी या बैठकीत केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news dindi