esakal | पालखीसाठी 93 हजार लिटर रॉकेलसाठा राखीव 
sakal

बोलून बातमी शोधा

 पालखीसाठी 93 हजार लिटर रॉकेलसाठा राखीव 

पालखीसाठी 93 हजार लिटर रॉकेलसाठा राखीव 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - पंढरपूर आषाढीवारी येत्या 16 जूनपासून सुरू होणार आहे. त्यासाठी दिंडीच्या नावाने चारशे तात्पुरते रेशनकार्ड काढले आहेत. त्याद्वारे पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये स्वस्त धान्य, साखर आणि रॉकेल दिले जाणार आहे. पालखीसाठी आठ टॅंकरद्वारे 93 हजार लिटर रॉकेलसाठा राखीव ठेवला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली. 

पालखीसाठी जिल्हा अन्नधान्य वितरण विभागाकडून स्वस्त अन्नधान्य वितरण केंद्रांवर साखर, धान्याचा मुबलक साठा केला आहे. तसेच, दोन्ही पालखी मार्गांवरील दिंड्यांसाठी 26 हजार 200 अनुदानित सिलिंडरही पुरविण्याची व्यवस्था केली आहे. 78 पाणी टॅंकर, 130 रुग्णवाहिका, दोन शववाहिनी आणि दोन्ही मार्गांसाठी दोन अग्निशमन गाड्या तैनात केल्याचेही त्यांनी सांगितले.