esakal | तुकोबांच्या रथाला "सर्जा-राजा' अन्‌ "माणिक-राजा' 
sakal

बोलून बातमी शोधा

तुकोबांच्या रथाला "सर्जा-राजा' अन्‌ "माणिक-राजा' 

तुकोबांच्या रथाला "सर्जा-राजा' अन्‌ "माणिक-राजा' 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

देहूरोड - पंढरीच्या आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला मानाच्या दोन बैलजोड्यांची नावे मंगळवारी (ता 30) जाहीर करण्यात आली. त्यात लोहगावातील भानुदास भगवान खांदवे यांच्या "सर्जा-राजा' तर चिंबळी (ता खेड) येथील अप्पासाहेब महादू लोखंडे यांच्या "माणिक-राजा' या बैलजोड्यांना यंदा मान देण्यात आला आहे. 

संस्थान कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत संस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे, पालखी सोहळाप्रमुख अभिजित मोरे, सुनील दि. मोरे यांनी ही माहिती दिली. विश्वस्त सुनील दा. मोरे, विठ्ठल मोरे उपस्थित होते. अभिजित मोरे, सुनील दि. मोरे म्हणाले, ""संस्थानकडे 18 अर्ज आले होते. त्यातून खांदवे आणि लोखंडे यांच्या बैलजोड्यांवर विश्वस्त मंडळाचे शिक्कामोर्तब केले.'' 

याबाबत लोहगावचे भानुदास खांदवे म्हणाले, ""लोहगाव हे तुकोबांचे आजोळ आहे. वडिलांनी पंधरा वर्षे पंढरीची पायी वारी केली. 2009 च्या वारीत वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. 2010 मध्ये त्यांचे निधन झाले. तुकोबांच्या पालखी रथासाठी आपल्या बैलांना संधी मिळावी, अशी वडिलांची इच्छा होती. ती पूर्ण करण्याची संधी तुकोबांच्या आशीर्वादामुळे मिळाली.'' 

अप्पासाहेब लोखंडे म्हणाले, ""तुकोबांच्या पालखी रथास बैलजोडीचा मान मिळावा म्हणून गेली चार ते पाच वर्ष प्रयत्न केले. ती इच्छा यंदा पूर्ण झाल्याने आमच्या कुटुंबासह चिंबळी गावाला आनंद झाला आहे. आमचे घराणे वारकरी आहे. बैलजोडी खास पालखी सोहळ्यासाठी खरेदी केली आहे.