श्री ज्ञानेश्वर महाराज वेदप्रणीत रेडा समाधी देवस्थानच्या पायीवारी पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 July 2018

आळेफाटा ता. ७ : आळे (ता. जुन्नर) येथील श्री ज्ञानेश्वर महाराज वेदप्रणीत रेडा समाधी देवस्थानच्या आळे ते पंढरपूर पायीवारी पालखी सोहळ्याचे, नुकतेच शुक्रवारी (ता.६) सायंकाळी भक्तिभावपूर्ण वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. 

आळेफाटा ता. ७ : आळे (ता. जुन्नर) येथील श्री ज्ञानेश्वर महाराज वेदप्रणीत रेडा समाधी देवस्थानच्या आळे ते पंढरपूर पायीवारी पालखी सोहळ्याचे, नुकतेच शुक्रवारी (ता.६) सायंकाळी भक्तिभावपूर्ण वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. 

आळे येथील श्री ज्ञानेश्वर महाराज वेदप्राणित रेडा समाधी देवस्थानच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे होणा-या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी, आळे ते पंढरपूर पायी वारी पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी पालखीचे प्रस्थान निमित्त मंदिर परिसरात भाविकांची गर्दी झाली होती. यावेळी सुदाम महाराज बनकर व राजाराम महाराज जाधव यांचे हस्ते विणा पुजन झाले. यावेळी देवस्थान संस्थेचे विश्वस्त चंद्रकांत वाव्हळ, ज्ञानेश्वर गाढवे, प्रसन्न डोके, दीपक कुऱ्हाडे, नागेश  कु-हाडे, भगवान सहाणे, कैलास शेळके, भागाजी शेळके, नवनिर्वाचित विश्वस्त धनंजय काळे, विलास शिरतर, गणेश गुंजाळ, बंटी कोकणे, पांडुरंग डावखर, अविनाश कु-हाडे, संजय खंडागळे, सुदर्शन भुजबळ, संजय शिंदे, संदीप डावखर कान्हू पाटील कु-हाडे आदींसह मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती.

 यावेळी भक्तिभावपूर्ण वातावरणात ज्ञानोबा माउली तुकारामच्या जयघोषात पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. दरम्यान हा पायी वारी पालखी सोहळा आळे येथून बेल्हे, पारगाव निमोणे, दौंड, भिगवण, टेंभुर्णी, करकंब मार्गे पंढरपूर येथे पोहचणार आहे. 
(अर्जुन शिंदे, बातमीदार - आळेफाटा)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sri Dnyaneshwar Maharaj Ved Pranit Radi Samadhi Devasthan's Pahadi Palkhi Festival commences on Pandharpur