esakal | पालखी स्वागतासाठी लोणी काळभोर सज्ज 
sakal

बोलून बातमी शोधा

पालखी स्वागतासाठी लोणी काळभोर सज्ज 

पालखी सोहळ्यादरम्यान अत्यावश्‍यक सेवांसाठी उपलब्ध यंत्रणा व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे ः लोणी काळभोर पोलिस ठाणे - 020-26913260, प्राथमिक आरोग्य केंद्र - वैद्यकीय अधिकारी - डॉ. दगडू जाधव - 9822895345, पंचायत समिती सदस्य - युगंधर काळभोर - 9975907777, सरपंच - वंदना काळभोर - 9860504141, उपसरपंच - योगेश काळभोर - 9764177799 

पालखी स्वागतासाठी लोणी काळभोर सज्ज 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

लोणी काळभोर - संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, महसूल विभाग व पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. 

पुणे शहरातील मुक्काम आटोपून ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी (ता. 20) लोणी काळभोर येथे येणार आहे. लोणी काळभोर ग्रामपंचायतीने गावातील मुख्य रस्ते, बाजार परिसर, पालखीतळ व विठ्ठल मंदिर परिसराची स्वच्छ केली आहे. वारकऱ्यांसाठी पिण्याचे व शौचालयांसाठी लागणाऱ्या पाण्याचे नियोजन केले आहे. डासांच्या उपद्रव थांबविण्यासाठी गावामध्ये फॉगिंग मशिनच्या साह्याने धुरळणी केली आहे. रस्त्यावरील पथदिव्यांचीदेखील दुरुस्ती करण्यात आल्याची माहिती सरपंच वंदना काळभोर यांनी दिली. 

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने लोणी काळभोर व कदमवाकवस्ती गावांच्या परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची तपासणी करण्यात आली आहे. जलस्रोतांमधून केवळ शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी सर्व ठिकाणच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण केले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या मदतीने वारकऱ्यांना आरोग्य सेवा व औषधपुरवठा करण्याचा प्रयत्न असल्याचे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी सांगितले. 

लोणी काळभोर पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलिस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड व पोलिसमित्र संघटनेच्या वतीने पालखीमार्गावर वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार आहे. पालखी सोहळ्याच्या काळात कवडीपाट टोल नाका ते उरुळी कांचन (ता. हवेली)दरम्यान वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.