विठ्ठल आमुचे जीवन!

अभिजित मोरे, विश्वस्त, श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू
Tuesday, 4 July 2017

वारीमध्ये मिळणारा आनंद अवर्णनीय आहे. त्याचे मोल कशातच मोजता येत नाही. वारीच्या काळात सर्व काही विसरून येथे एकाग्र होता येते, हीच या वारीची महती आहे.

उदंड पाहिले उदंड ऐकीलेI उदंड वर्णिले क्षेत्रमहिमेII

वारीमध्ये मिळणारा आनंद अवर्णनीय आहे. त्याचे मोल कशातच मोजता येत नाही. वारीच्या काळात सर्व काही विसरून येथे एकाग्र होता येते, हीच या वारीची महती आहे.

उदंड पाहिले उदंड ऐकीलेI उदंड वर्णिले क्षेत्रमहिमेII
माझे आजोबा पंढरीची वारी करीत असत. त्यानंतर 11 वर्षांपूर्वी मी पायी वारीला सुरवात केली. गेल्या पाच वर्षांपासून संत तुकोबारायांच्या कृपेने संस्थानचे विश्वस्तपद मिळाले. त्या निमित्ताने सेवा करण्याची संधी मिळत आहे. वारीमध्ये मिळणारा आनंद अवर्णनीय आहे. त्याचे मोल कशातच मोजता येत नाही. वारीच्या काळात सर्व काही विसरून येथे एकाग्र होता येते, हीच या वारीची महती आहे. मी उदंड तीर्थक्षेत्रे पाहिली, उदंड ऐकलीही आहेत; पण पंढरपूरसारखे तीर्थक्षेत्र मला कोठेही पाहायला मिळाले नाही. पंढरी ही विठुरायाची नगरी आहे. येथे सुंदर ते ध्यान उभे विठेवरी असे रूप दिसून येते. हा भक्तीचा तारक मुनी भावाचा भुकेला आहे. त्यांच्या भक्तीत रंगून गेल्यावर आनंदाचे भरते आले आहे. माझ्याकडून ही सेवा तुकोबाराय आणि श्रीविठ्ठलच करून घेत आहेत. "विठ्ठल आमुचे जीवन' हा अभंग गेल्या 20 दिवसांच्या वाटचालीमध्ये पावलोपावली प्रत्ययाला आला. विठ्ठलाच्या नामस्मरणाने अवघी वाट सुखकर होऊन जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wari news palkhi sohala abhijit more