वारीद्वारे केली अपंगत्वावर मात 

सचिन शिंदे, तुकोबाराय पालखी सोहळा.
Friday, 30 June 2017

तो पायान अपंग... ती दोन पायाने अपंग.. पत्नीची इच्छा होती वारी करायची... म्हणून ते वारीत आले. ते सोहऴ्यासोबतही आहेत. मात्र पत्नी अपंगाच्या सायकलमध्ये बसते. तो पायान अपंग असूनही तीची सायकल ढकलतोय. सतीश व अर्चना असे त्यांचे नाव. दोघेही उस्मानाबादच्या परांडा येथील  रहवाशी. दोघेही जेमतेम कमावणारे. अपंगत्व त्यांच्यातील काॅमन फॅक्टर. तस बघायला गेल तर अपंगत्व म्हणजे जीवनाची एक बाजू कायमची अधू असण. पण या दांपत्याने तो आधुपणा पूसन टाकला तो त्यांच्यातील प्रेमाने एकमेकाला दिलेल्या आधारानेच. दोघांचेही वय तिशीतलेच. मात्र त्यांच्यातील प्रगल्भता मात्र पन्नाशीतली होती. दोघेही जन्मापासून आधू.

तो पायान अपंग... ती दोन पायाने अपंग.. पत्नीची इच्छा होती वारी करायची... म्हणून ते वारीत आले. ते सोहऴ्यासोबतही आहेत. मात्र पत्नी अपंगाच्या सायकलमध्ये बसते. तो पायान अपंग असूनही तीची सायकल ढकलतोय. सतीश व अर्चना असे त्यांचे नाव. दोघेही उस्मानाबादच्या परांडा येथील  रहवाशी. दोघेही जेमतेम कमावणारे. अपंगत्व त्यांच्यातील काॅमन फॅक्टर. तस बघायला गेल तर अपंगत्व म्हणजे जीवनाची एक बाजू कायमची अधू असण. पण या दांपत्याने तो आधुपणा पूसन टाकला तो त्यांच्यातील प्रेमाने एकमेकाला दिलेल्या आधारानेच. दोघांचेही वय तिशीतलेच. मात्र त्यांच्यातील प्रगल्भता मात्र पन्नाशीतली होती. दोघेही जन्मापासून आधू. त्यांची गाठ पडली. त्यानंतर विवाहही झाला. चार महिनेच झाले विवाहाला. मात्र दोघेही एकमेकांना सावरताना दिसत होते. पता - पत्नीच प्रेम किती अतूट असत तो साऱ्यानाच माहिती आहे. मात्र आयुष्याच्या वाटेवर चालताना कमजोर धागाच पक्का करण्यैची मानसिकता ठेवून एकमोकांना सावरण्याची किमया सतीश व अर्चना यांनी अतिशय उत्कृष्ठपणे सांभाळली आहे. त्यांचा एकमेकांवर बक्कळ विश्वास आहे. इंदापूरपासून वारीत ते सगळ्यात पुढे होते. अकलूजमध्ये त्यांची सायकल खराब झाली. त्याची चेन तुटल्याने ते थांबले होते. त्यावेळी ते सापडले. त्यांना विचारले त्यावेळी ते देहूपासून असल्याचे कळाले. केवळ बायकोची इच्छा म्हणून ते जोडीन वारी करताहेत. ते कोणत्या दिंडीत नाहीत. ते कधीही पुढे दिसले नाहीत. ते मोकळ्या जागेच आपला संसार मांडून विसाव्याला दिसतात. मात्र तरीही ते वारी सोबत चालत आहेत. सतीशने यापूर्वी वारी केली आहे. मात्र बायकोने सोहळा पाहिला नव्हता. तीला सोहळा दाखवण्यासाठी व त्या निमित्ताने जोडीने वारी पूर्ण होईल, याच उद्देशाने ते वारीत आले आहेत. वारीचे नियम, परंपरा, त्यातील सांप्रदािकता या सगळ्याची कल्पना त्यांना असेल किंवा नसेलही. ती जाणून घेण्यासाठी ते कितपत प्रयत्न करतील, याला फारसे महत्व नाही. मात्र सावळ्या पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने निघालोल्या सोहळ्यातील सतीश व अर्चना यांनी वारीद्वारे अपंगत्वानर मात करत संसाराचा पाया भक्कम केल्याची जाणीव मात्र नक्की होतेय.....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wari news sant tukaram maharaj palkhi sohala