वारीच्या वाटेवरील प्रकाशमान सुधारक 

- सचिन शिंदे, तुकोबाराय पालखी सोहळा
Tuesday, 27 June 2017

संत तुकाबारायांचा पालखी सोहळा निमगाव केतकी येथे पोचली. गावात एका मोठ्या मंडपात वारकऱ्यांची सेवा सुरू होती. एकात छताखाली सर्वकाही असाच प्रकार तेथे सुरू होता. सहज चौकशी केली. त्यावेळी या सगळ्याचे जनक मच्छींद्र उर्फ आप्पा चांदणे यांचेच नाव सगळ्यांच्या ओठावर आले. त्यांची भेट घेतली. एका मराठ मोळा जाॅली माणूस वाटले. एका तळावर बागायती शंभर एकर जमीन त्यांची. एकदिलाने राहणारे  सहा भाऊ म्हणजे विणलेली तारच. आप्पांचा स्वभाव अत्यंत चांगला. त्यांची वृत्ती चळवळी.

संत तुकाबारायांचा पालखी सोहळा निमगाव केतकी येथे पोचली. गावात एका मोठ्या मंडपात वारकऱ्यांची सेवा सुरू होती. एकात छताखाली सर्वकाही असाच प्रकार तेथे सुरू होता. सहज चौकशी केली. त्यावेळी या सगळ्याचे जनक मच्छींद्र उर्फ आप्पा चांदणे यांचेच नाव सगळ्यांच्या ओठावर आले. त्यांची भेट घेतली. एका मराठ मोळा जाॅली माणूस वाटले. एका तळावर बागायती शंभर एकर जमीन त्यांची. एकदिलाने राहणारे  सहा भाऊ म्हणजे विणलेली तारच. आप्पांचा स्वभाव अत्यंत चांगला. त्यांची वृत्ती चळवळी.

1980 च्या आधीपासून त्यांनी गावात अनेक उपक्रम राबवले आहेत. सांगायचा मुद्दा असा की, गावोगावी जी जेवणावळ वारकऱ्यांसाठी सुरू आहे. त्याचा मेढ आप्पांनी लावली. सुरवातीला  घरात व नंतर महाप्रसाद त्यांनी सुरू केला. त्याच वेळी वारकऱ्यांची फाटलेली कपडे शिवून देणे, पायाला तेल लावून दुखणारो पाय चेपून देणे, त्यांना तपासण्यासाठी डाॅक्टरांकडून तपासणी करून घेणे अशा अनेक सुविधा 1980 च्या दशकापासून आज अखेर सुरू आहेत. त्या अव्याहतपणे चालू ठेवण्यासाठी हरएक प्रकारचे प्रयत्न ते कटाक्षाने करतात. त्याशिवाय त्यांचे कार्य त्यांच्या व्यक्तीमत्वाला अधिक प्रकाशमान करते. वर्षभराच सामाजिक कार्य करता यावे म्हणून त्यांनी अनेक मार्ग निर्माण केले आहेत. ते अव्याहतपणे सुरूही आहेत.

व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणारे सर्वात जुने म्हणून भागातच नव्हे तर जिल्ह्यात ते प्रसिद्ध आहेत  सर्व प्रकारची आरोग्य शिबीर बिना डामडौलाचे ते घेतात. अर्थात ती मोफत असतात. मुलामध्ये वक्तृत्व वाढले पाहिजे म्हणून ते भागात त्या स्पर्धा घेतात. प्रती वर्षी साठ बक्षीसे त्यांच्या तर्फे दिली जातात.  आप्पांनी नृसिंह प्रतिष्ठान स्थापन केले  त्या माध्यमातून ते प्रत्येक वर्षी 150 मुलीना शिक्षणासाठी दत्तक घोतात. त्या मुलींचा पालक म्हणीनही आप्पा ओळखले जातात. सत्यशोधक पद्धतीने लग्न लावण्याची परंपरा घालून देणारा सुधारक म्हणूनही आप्पांची ओळख आहे. त्यांची ही पद्धत चळवळ बनली आहे. ती वाढतेच आहे .शेती व शेतीपुरक व्यवसायाचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणारा दिलखुलास बागायतदार म्हणूनही त्यांचा लौकीक आहे. आप्पा शेती करतात. त्यांना पाच भाऊ आहेत. तेही त्यांच्या उपक्रमात तितक्याच उत्स्फुर्त सहभागी होतात. अर्थात सावली कधी वेगळी होवू शकत  नाहीत. तेसच त्यांचे बंधू आहेत. त्यांचा हार्डवेअर ड्रीप मशीनरीचा व्यवसाय आहे. पाच दहा एकर बागायती जमीन असेल तर काही जमीनदारांचा डामडौल किती असतो. याची जाणीव अलीकडच्या अनेक गुंठा मंत्र्यांमुळे समाजाला दिसतो. आहे. अशा स्थितीत आप्पांसारख्या व्यक्ती दिपस्तंभाप्रमाणे नेहमीच आपल्या कामांची ज्योत तेवत ठेवत असतात. वारीचा सोहळा दिवसें दिवस फुलताना.. वाढताना दिसतोय.... त्या वारीला आप्पांसारख्या व्यक्ती अधिक प्रकाशमान करताना दिसत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wari sachin shinde sant tukaram maharaj palkhi sohala