esakal | जोडी पडद्यावरची : एका मैत्रीची गोष्ट!
sakal

बोलून बातमी शोधा

Aaroh-Mitali

झी मराठीवर ‘लाडाची मी लेक गं’ ही नवी मालिका १४ सप्टेंबरपासून रोज संध्याकाळी सात वाजता सुरू होत आहे. या मालिकेतून सौरभ (आरोह वेलणकर) आणि कस्तुरी (मिताली मयेकर) ही जोडी आपल्यासमोर येणार आहे.

जोडी पडद्यावरची : एका मैत्रीची गोष्ट!

sakal_logo
By
आरोह वेलणकर - मिताली मयेकर

झी मराठीवर ‘लाडाची मी लेक गं’ ही नवी मालिका १४ सप्टेंबरपासून रोज संध्याकाळी सात वाजता सुरू होत आहे. या मालिकेतून सौरभ (आरोह वेलणकर) आणि कस्तुरी (मिताली मयेकर) ही जोडी आपल्यासमोर येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोह आणि मिताली यांची पहिली भेट झाली होती ती एकांकिका स्पर्धेच्या निमित्तानं. एकांकिका स्पर्धेच्या वेळी ‘ॲनास्थेशिया’ या एकांकिकेत आरोहनं काम केलं होतं आणि ती एकांकिका खूप गाजली होती. मितालीसुद्धा रुईया कॉलेजच्या एका वेगळ्या एकांकिकेत होती. तेव्हा आरोहचं काम खूप आवडल्याची प्रतिक्रिया मितालीनं दिली होती. त्यानंतर आरोह आणि मितालीची खरी ओळख आणि मैत्री झाली ती ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेच्या चित्रीकरणाच्या वेळी! आरोह या मालिकेतील आपल्या भूमिकेबद्दल म्हणतो, ‘‘मी यात डॉक्टर सौरभ ही व्यक्तिरेखा साकारत आहे.

हा एक आदर्श डॉक्टर आहे, एक आदर्श माणूस आहे, हुशार आहे आणि कर्तृत्ववान आहे. समाजात अशी आदर्श व्यक्ती असावी, अशी ही आदर्श डॉक्टरची भूमिका आहे.’’ मिताली आपल्या भूमिकेबद्दल म्हणाली, ‘‘मी ‘लाडाची मी लेक गं’मध्ये ‘कस्तुरी’ ही भूमिका करत आहे. माझ्या स्वभावाच्या पूर्णपणे वेगळी अशी ही व्यक्तिरेखा आहे. कस्तुरी अतिशय शांत, थोडीशी लाजरीबुजरी आहे. ती अतिशय सहनशील आहे, चाळीत राहणारी आहे. एक नायिका या नात्यानं या व्यक्तिरेखेचे अनेक कंगोरे यातून मला साकारायला मिळत आहेत.’’

मितालीच्या स्वभावातील गुणांबद्दल बोलताना आरोह म्हणतो, ‘‘मिताली एक उत्तम अभिनेत्री आहे. आपल्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेणारी आहे.’’ मिताली आरोहविषयी सांगते, ‘‘आरोह सगळ्यांची काळजी घेणारा आहे. दुसऱ्याचा विचार करणारा आहे. सर्वांवर प्रेम करणारा आहे आणि मुख्य म्हणजे तो माझ्यासारखाच प्राणिप्रेमीदेखील आहे.’’

आरोहच्या आत्तापर्यंतच्या कामातली ‘ॲनास्थेशिया’ या एकांकिकेतील त्याची भूमिका मितालीला सर्वांत जास्त आवडलेली भूमिका आहे, तर ‘ननैतिक’ या एकांकिकेतील मितालीची भूमिका आरोहला आवडली होती.

डॉक्टर सौरभ आणि कस्तुरी यांची कथा आपल्याला ‘लाडाची मी लेक गं’मध्ये पाहता येईल. या मालिकेत प्रेम आणि संघर्ष या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहता येणार आहेत.
(शब्दांकन : गणेश आचवल)

Edited By - Prashant Patil