esakal | पालकत्व निभावताना... : अष्टावधानी!
sakal

बोलून बातमी शोधा

Parenting

पालकत्वाकडं तितकंच गांभीर्याने पाहणाऱ्या महिलांच्या विविध कौशल्यावर आपण याच सदरातून बोलत राहणार आहोत. अर्थात, त्यासाठी तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत...!

पालकत्व निभावताना... : अष्टावधानी!

sakal_logo
By
आशिष तागडे

‘आई, माझा डबा भरलास का? आज दोन डबे दे, कॉलेज सुटल्यावर थेट क्रिकेटचा सराव करायला जाणार आहे...’ बाथरूममध्ये शिरता-शिरता लेकीनं दिलेला आदेश...

‘अगं, आज मला ऑफिसला लवकर जायचं आहे, माझाही डबा भरून ठेव...’ वर्तमानपत्र वाचणं बंद करत ‘अहों’नी सोडलेल्या ऑर्डरवर ‘अहो, तुमचा आणि तुमच्या लाडलीचा डबा भरून झाला आहे. आता तो बॅगमध्ये तुम्ही ठेवणार की मी ठेवू,’ असा लाडिक दम...
सकाळी सकाळी प्रत्येक घरातच असे संवाद सुरू असतात आणि त्यामध्ये मुख्य भूमिकेत असते अर्थातच घरातील गृहिणी...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अहोंचा पेपर वाचून होईपर्यंत ‘सौं’चा स्वयंपाक झालेला असतो. मग घरातील केर काढताना दिवसभरातील कामांचा वेगवान आढावा घेणं सुरू असतं आणि दुसरीकडं स्वतःच्या ऑफिसला जायच्या तयारीवर शेवटचा हात फिरवला जातो. (ही तयारी तिला स्वत:लाच करावी लागते, त्यासाठी कोणाची मदत नसते.) खरोखरच महिलांची ही तारेवरची कसरत रोज सुरू असते. आपण घरातील आधारस्तंभ असल्याने सर्व कामे आपलीच आहेत, या मानसिकतेत महिला वावरत असतात. 

यावर विचार केल्यास ते योग्यही असल्याचं लक्षात येतं. 

1) निसर्गतः महिलांना अष्टावधानाची देणगी लाभलेली असते. स्वयंपाक करताना हे सहजतेने लक्षात येते. एका बाजूला पोळ्या करणे सुरू असताना दुसऱ्या बाजूला भाजी फोडणीला दिलेली असते, तर तिसऱ्या बाजूला जेवणाच्या डब्यांची जुळवाजुळव सुरू असते.

2) यासर्व धांदलीत घराकडं मात्र कुठंही दुर्लक्ष नसते. ऑफिसमधून येताना उद्यासाठी काय भाजी घ्यायची, याचं नियोजन सकाळी ऑफिसमध्ये निघतानाच झालेलं असतं, तर घरातील किराणा किती दिवसांनी भरायचा हे निश्‍चित करण्याचं कामही सुरू असतं.

3) हा सुपर वुमनचा फॉर्म्युला नाही किंवा काही अपवाद सोडल्यास महिलांना सुपर वुमन होण्यात गृहिणीला कोणताही रस नसतो. रस असतो ते आपले घराचे घरपण टिकविण्यात. ऑफिसहून घरी आल्यावर पुन्हा याच चक्रात ती पुन्हा स्वत:ला फिट बसविते, उद्याचा दिवस चांगला जाण्यासाठी....

loading image