आधीपासूनच्या मैत्रीमुळं घट्ट बॉण्ड! 

देवदत्ता नागे व श्‍वेता शिंदे, अभिनेते 
Saturday, 1 August 2020

श्‍वेता शिंदे हिने ‘अधांतरी’,‘देऊळ बंद’यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप पाडली.अभिनेता देवदत्त नागे ‘संघर्ष’,‘तान्हाजी’यांसारख्या चित्रपटांतून आपल्या सर्वांसमोर आला.

‘लगिरं झालं जी’ आणि ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकांची निर्माती श्‍वेता शिंदे हिने ‘अधांतरी’, ‘ईश्श’, ‘देऊळ बंद’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप पाडली. अभिनेता देवदत्त नागे ‘सूर्याजी’, ‘लागी तुझसे लागन’, ‘देवयानी’ यांसारख्या मालिका, तर ‘संघर्ष’, ‘वन्स अपॉन टाइम इन मुंबई दोबारा’, ‘तान्हाजी’ यांसारख्या चित्रपटांतून आपल्या सर्वांसमोर आला. त्याने केलेल्या ‘जय मल्हार’ या मालिकेतील खंडेरायाच्या भूमिकेचं सर्वत्र प्रचंड कौतुक झालं. ही दोघ आता ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. 

पहिल्या भेटीबद्दल सांगताना श्‍वेता म्हणाली, ‘‘आम्ही मालिकेच्या आधीपासून एकमेकांना ओळखतो. माझ्यासोबत देवा भूमिका करणार असल्याचे सजल्यावर मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. करण अशीही जोडी स्क्रिनवर दिसू शकते, असं मी कधी इमॅजिन नव्हतं केलं. छान वाटलं होतं की, या निमित्तानं आम्हाला एकत्र काम करायला मिळणार होतं. ‘‘हो, आम्ही खूप पूर्वीपासूनचे मित्र-मैत्रीण आहोत. खरंतर फॅमिली फ्रेंड्स आहोत. तिचा नवरा करण माझा खूप चांगला मित्र आहे. माझे गुरु प्रसादजी पंडित यांनी दिग्दर्शित केलेल्या पिच्चरमध्ये तोही होता. त्यामुळं आमची भेट खूप पूर्वीच झाली होती. ती माझ्याबरोबर सिरियलमध्ये असणार हे समजल्यावर मलाही खूप आनंद झाला, कारण आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करणार होतो,’’ असं देवदत्तन सांगितलं. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देवदत्तच्या स्वभावाबद्दल श्‍वेता म्हणते, ‘‘देवदत्त गुड बॉय आहे. तो सगळ्यांशी छान वागतो, नम्रपणे बोलतो, समोरच्या व्यक्तीचा खूप आदर करतो. तो प्रत्येकाशी तितक्याच आदरानं वागतो. सेटवरती तो शांत असतो. त्याची सगळी कामं वेळेत असतात, परफेक्ट असतात. मालिकेमध्ये जसा दिसतो त्याच्या अगदी विरुद्ध...’’ तर श्‍वेताच्या स्वभावाबद्दल बोलताना देवदत्त म्हणाला, ‘‘ती फार छान मुलगी आहे. खूप चांगली अभिनेत्री आणि निर्माती असूनही तिचे पाय जमिनीवरच असतात. तिच्या मनात जे असतं, तिला त्या क्षणी जे वाटतं, ते ती बोलून टाकते. सेटवर सगळ्यांशी छान गप्पा मारणं, मिळून मिसळून वागणं हे तिला खूप छान जमतं. त्यामुळं आमच्या सेटवर खेळीमेळीचं वातावरण असतं." 

तुमच्यात असं काय कॉमन आहे, ज्यामुळं तुमचं बॉन्डिंग घट्ट झालं असं विचारल्यावर श्‍वेता म्हणाली , ‘‘खाणं! आम्ही दोघेही प्रचंड फूडी आहोत. आम्हा दोघांनाही नॉनव्हेज खायला खूप आवडतं.’’ तर देवदत्त म्हणाला, ‘‘बरोबर आहे. म्हणतात ना की कोणतंही नातं घट्ट होण्याचा मार्ग हा पोटाकडून जातो. आम्ही दोघंही खवय्ये आहोत. आम्हा दोघांनाही लाल रंग आवडतो आणि मुख्य म्हणजे आधीपासूनची मैत्रीच आमचा बॉन्ड घट्ट होण्यामागचा कॉमन फॅक्टर आहे." 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकमेकांकडून कोणती गोष्ट शिकाला आवडंल या प्रश्‍नावर श्‍वेता म्हणते, ‘‘समर्पण. देवदत्त खूप समर्पित भावनेनं कोणतीही गोष्ट करतो. त्याला फिटनेसची खूप आवड आहे. त्यामुळं शूटिंगच्या वेळेनुसार तो जिममध्ये जाऊन न चुकता व्यायाम करतो. ही त्याची गोष्ट आहे जी मला आत्मसात करायला खरचं आवडंल.’’ देवदत्त म्हणाला, ‘‘श्वेता खूप स्पॉंटेनियस आहे. आणि मॅनेजमेंट. ती स्वतः एक प्रोड्यूसर आहे, अभिनेत्री आहे आणि तिचं घर, कुटुंब या तीन गोष्टी ती खूप छान पद्धतीने मॅनेज करते. ती कधीच रागावलेली दिसणार नाही. त्यामुळं मला तिच्यासारखी स्पॉंटेनिटी आणि मॅनेजमेंट शिकायची आहे.’’ 

सेटवरच्या गमतीजमतींविषयी सांगताना ते म्हणाले की, आम्ही कामाव्यतिरिक्त सेटवर खूप मस्ती करतो. बऱ्याचदा आम्ही असा एक जण ठरवतो आणि सगळे मिळून त्याला टार्गेट करतो. एकमेकांचे खूप प्रँक्स करतो. पण ही सगळी हेल्थी मस्ती असते. त्यामुळं आमच्या सेटवर कायमच आनंदी, उत्साही आणि छान वातावरण असतं... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about Devdatta Nage and Shweta Shinde friendship