esakal | माझी बेस्ट फ्रेंड 
sakal

बोलून बातमी शोधा

shivani-sonar

‘जे करायचं ते समजून-उमजून कर, चांगल्या-वाईटाची जाण ठेव,’ असेच संस्कार मला दिले. कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जा, जे करायचं ते मनापासून कर, हीच शिकवण तिनं दिली. 

माझी बेस्ट फ्रेंड 

sakal_logo
By
शिवानी सोनार, अभिनेत्री

प्रत्येक आईचं स्वप्न असतं, की माझ्या मुलीनं हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे. तसंच स्वप्न माझ्या आईनंही पाहिलं. मला जन्म दिला, तेव्हापासूनच तिनं मी इंडिपेंडंट व्हावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं एवढंच स्वप्न पाहिलं आणि त्याच पद्धतीनं मला घडवलं. तिनं माझ्यावर कोणतंही बंधन घातलं नाही. ‘जे करायचं ते समजून-उमजून कर, चांगल्या-वाईटाची जाण ठेव,’ असेच संस्कार मला दिले. कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जा, जे करायचं ते मनापासून कर, हीच शिकवण तिनं दिली. 

मला कोणत्याही बाबतीत आणि कोणाही समोर हात पसरण्याची वेळ येऊ देऊ नये, असं स्वप्न तिनं पाहिलं आणि ते पूर्ण करण्यास मला भाग पडलं. आज मी जी काही आहे, ते आईमुळेच. माझा स्वभावही आईसारखाच आहे. खरंतर आई-बाबांपैकी एकाची निवड करणं खूप अवघड आहे; पण मला काही सांगायचं असतं, त्यावेळी सर्वप्रथम मी आईलाच प्राधान्य देते. कारण, बाबांबद्दल आदरयुक्त भीती आहे. त्यामुळे त्यांच्याऐवजी आईलाच मी सर्व गोष्टी मनमोकळेपणान सांगते. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

माझ्या आईला लहानपणापासून पार्लरची आवड होती. तिला ब्युटीशियन व्हायचं होतं; पण ती झाली नाही. तिला मेंदी काढायला आवडायची. त्यामुळे ती मेंदीच्या ऑर्डर घेत असे; पण लग्नानंतर ती संसारात अडकली. त्यामुळे ती स्वतःचं स्वप्न विसरून गेली. मात्र, ही गोष्ट माझ्या लक्षात आली. आमच्यामुळे तिच्या स्वप्नांवर बंधनं आली. त्यामुळे मी, भाऊ आणि बाबांनी तिच्या स्वप्नांना पाठबळ द्यायला सुरुवात केली. त्यानंतर ती गाडी चालवायला शिकली. पार्लर अन् मेंदीचा कोर्स तिनं केला. आज ती स्वतःच्या पायावर उभी असून तिनं तिचं स्वप्न पूर्ण केलं आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

खरंतर माझे सर्व मित्र मुलगेच आहेत. मुलींमध्ये फक्त एकटीच माझी बेस्ट फ्रेंड आई आहे. तिच्यामुळे मलाही मेकअपची आवड लागली आणि मी मेक-अप आर्टिस्ट झाले. आता आम्ही दोघीही मेकअपच्या ऑर्डर घेतो. खरंतर मी तिची बिझनेस पार्टनरच झाले आहे. त्यामुळे आम्ही बरोबर काम करतो. अभिनय क्षेत्रात येण्यासाठी आई आणि बाबांनी मला खूप पाठबळ दिलं. नेहमीच माझ्यासाठी झटत राहिले. त्यामुळेच मी अभिनय क्षेत्रात येऊ शकेल. सध्या मी ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘राजा राणीची ग जोडी’ या मालिकेत संजीवनीचं पात्र साकरत आहे. आगामी काळातही मी वेगवेगळ्या भूमिका साकारणार असून, त्यासाठी आईची साथ मला नक्कीच मिळेल. खरंतर ती आहे म्हणून मी आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(शब्दांकन : अरुण सुर्वे) 

loading image
go to top