जोडी पडद्यावरची : गोड कुटुंबाची छानशी गोष्ट

अदिती सारंगधर-अजिंक्य जोशी
Saturday, 8 August 2020

सोनी मराठी वाहिनीवरील ‘ह.म.बने, तु.म.बने’ ही मालिका लोकप्रिय आहे. यामध्ये ‘तु.म.बने म्हणजे तुलिका मल्हार बने ही व्यक्तिरेखा साकारते आहे अदिती सारंगधर आणि मल्हार बने ही भूमिका करणारा अभिनेता आहे अजिंक्य जोशी. तुलिका आणि मल्हार ही जोडीही लोकांना आवडत आहे. अदिती आणि अजिंक्य यांची पहिली भेट झाली होती ‘लक्ष्य’च्या सेटवर.

सोनी मराठी वाहिनीवरील ‘ह.म.बने, तु.म.बने’ ही मालिका लोकप्रिय आहे. यामध्ये ‘तु.म.बने म्हणजे तुलिका मल्हार बने ही व्यक्तिरेखा साकारते आहे अदिती सारंगधर आणि मल्हार बने ही भूमिका करणारा अभिनेता आहे अजिंक्य जोशी. तुलिका आणि मल्हार ही जोडीही लोकांना आवडत आहे. अदिती आणि अजिंक्य यांची पहिली भेट झाली होती ‘लक्ष्य’च्या सेटवर.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अदिती तिच्या भूमिकेबद्दल म्हणते, ‘मुळात या मालिकेचे शीर्षक मला खूप आवडले. ह.म.बने, तु.म. बने म्हणजे हर्षदा मकरंद बने आणि तुलिका मल्हार बने ही कल्पनाच मला प्रचंड आवडली. मी लालबाग परिसरात वाढलेली तुलिका साकारत आहे. तिचे मल्हारवर, आपल्या कुटुंबावर प्रेम आहे.

घरासाठी करिअर घडवणे, हे तिचे ध्येय आहे आणि ‘पालकत्व’ हा विषय या मालिकेतून उत्तम हाताळला गेल्याने मला ही भूमिका करताना खूप मजा येते.’

‘मल्हार’च्या भूमिकेबद्दल अजिंक्य म्हणाला, ‘मल्हारला बिझनेसमन व्हायचे आहे, तो स्वप्न बघणारा आहे. ‘हॅपी गो लकी’ अशा स्वभावाची ही व्यक्तिरेखा आहे.’ आदिती सांगते, ‘अजिंक्य जोशी मालिकेच्या सेटवर असताना वातावरण खूप आनंदाचे, खेळकर ठेवतो. हा त्याच्या स्वभावातील चांगला गुण आहे. आपल्या भूमिकेतील निरागसता अजिंक्य उत्तम जगतो. अजिंक्य एखादे दृश्य चित्रित होत असताना कधीकधी खूप हसतो, ही गोष्ट मला खटकते.’ यावर अजिंक्य म्हणतो, ‘अदिती खूप दिलखुलास, मनमोकळ्या स्वभावाची, सकारात्मक विचार करणारी आहे. ती स्पष्टवक्ती आहे, हे कधीकधी मला खटकते.’ लॉकडाउनच्या काळात अजिंक्यने स्वयंपाक करणे, चांगले चित्रपट, वेबसिरीज बघणे आणि मुलींचा अभ्यास घेणे, यात वेळ घालवला. तर अदितीला घरासाठी खूप वेळ देता आला. अदिती म्हणते, ‘लॉकडाउनमध्ये मी खऱ्या अर्थाने आयुष्य जगले, मी स्वतःसाठी, कुटुंबासाठी खूप वेळ दिला. मी आमच्या घरातील कोपरा आणि कोपरा मला हव्या तशा पद्धतीने सजवला.

तसेच नृत्यकलेसाठीही वेळ दिला, मी माझ्या लहान मुलाला काही भाषांतील शब्द शिकवले.’ अदितीचे ‘लक्ष्य’ या मालिकेतील आणि ‘प्रपोजल’ या नाटकातील काम आवडल्याचे अजिंक्यने सांगितले आणि अजिंक्यने केलेली ‘पुढचं पाऊल’ मालिकेतील भूमिका अदितीला आवडली.
(शब्दांकन - गणेश आचवल)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article aditi sarangdhar and ajinkya joshi