पालकत्व निभावताना : नात्याचा नवा 'अर्थ'

Parenting
Parenting

मंजूषा... यंदा सातवी इयत्तेत गेली. आई मृदुला शहरातील मोठ्या रुग्णालयात, तर वडील खासगी बँकेत नोकरीला. आजीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाल्याने घरात तिघेच असायचे. आईच्या निधनानंतर तिच्या वडिलांनी मुलीकडे लक्ष देता यावे म्हणून घराजवळील ब्रँचला बदली मागितली, ती मिळालीही. तिच्या आईची मात्र धावपळ व्हायची. दिवसभरातील स्वयंपाक, घरातील अन्य आवरून तिला रुग्णालयात जावे लागायचे. मंजूषाला शाळेत सोडून तिचे बाबा बँकेत जायचे. शाळा सुटल्यानंतर मंजूषा गाण्याचा क्लास करून आईबरोबर घरी यायची. सारे काही रुटीन बसले असताना कोरोनाने त्यावर पाणी फिरविले. मंजूषाची शाळा, क्लास सारे बंद झाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउन असले, तरी आई-बाबांना ऑफिसला जावेच लागायचे. बरे, मंजूषाला कोणा नातेवाइकांकडे सोडायचे म्हणजे अडचणच. त्यावर तिनेच पर्याय काढला. ती आई-बाबांना म्हणाली, ‘‘तुम्ही निर्धास्त ऑफिसला जा. माझी काळजी करू नका. वाटल्यास दुपारी फोन करत जा. मी घरात राहीन एकटी आणि गाण्याचा रियाजही करीन.’ तिला नुकतीच चांगली पेटीही घेतली होती. तिने गाण्याच्या तीन परीक्षा उत्तमरीत्या पूर्ण केल्या होत्या, मुलीच्या या बोलण्याने दोघांनाही अक्षरशः गहिवरून आले होते. 

दोन-तीन दिवसांत मंजूषाचे आणि तिच्या आई-बाबांचे रुटीन लागले. मंजूषाला सर्व सूचना देऊन आई रुग्णालयात जाई. तिच्या खाण्या-पिण्याची योग्य व्यवस्था करूनच आई घराबाहेर पडायची. बाबा कधी रजा टाकत, तर कधी लवकर येत. आपल्यासाठी आई-बाबा ॲडजस्ट करत असल्याची जाणीव मंजूषाला झालेली होती. तिने तसे आई-बाबांना बोलून दाखवले. मंजूषामधील समंजसपणाबद्दल काय बोलावे, हे दोघांनाही सुचत नव्हते. दरम्यान, महिनाभरानंतर मंजूषाच्या बाबांची अचानकच दुसऱ्या शहरात बदली झाली. ही नवी समस्या निर्माण झाल्याने मंजूषाचे आई-बाबा चिंतेत होते. दोघांनी खूप विचार केला. दोघांपैकी एकाने नोकरी सोडायची, या मतापर्यंत ते आले होते.

काहीही झाले, तरी मंजूषाच्या बाबतीत कोठेही कमी पडायचे नाही, हे त्यांनी ठरविले होते. सुरुवातीचे काही दिवस थोडी ओढाताण होईल. मात्र, सारे व्यवस्थित झाल्यावर छोटा उद्योग सुरू करण्याचा त्यांचा प्लॅन होता. तसा तो अनेक वर्षांपासून होता, त्याला मूर्त स्वरूप येत नव्हते. यानिमित्ताने हे धाडस करायला काय हरकत आहे, हा विचार करून तिच्या बाबांनी नोकरीचा राजीनामा दिला. 

ही बाब मंजूषाच्या लक्षात आली. दोन दिवसांनंतर तिने बाबांना ‘नोकरीचा राजीनामा का दिला?’ असे विचारले; त्यावर बाबांनी ‘अगं, इतकी वर्षं नोकरी केली, आता कंटाळा आला म्हणून राजीनामा दिला,’ असे सांगितले. त्यावर ‘बाबा, तुम्ही माझ्याशी खोटं बोलत आहात ना,’ असे म्हणून तिच्याकडील मोठी मिंटी आणली. ती बाबांकडे देत म्हणाली, ‘बाबा, तुमच्या व्यवसायासाठी माझा खारीचा वाटा.’ त्यावर बाबाच्या डोळ्यांतून अश्रूशिवाय काहीच प्रतिक्रिया व्यक्त होऊ शकली नाही.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com