esakal | पालकत्व निभावताना... : हारी बाजी को जितना जिसे आता है
sakal

बोलून बातमी शोधा

Parenting

ऋत्विक कालपासून नाराज असल्याचे आई माधुरीच्या लक्षात आले होते. त्याची काल काहीतरी ऑनलाइन क्विझ कॉम्पिटिशन होती. गेल्यावर्षी वर्गात पहिला आल्याने यावेळी त्याची निवड झाली होती. तसा तो शाळेत वक्तृत्व, निबंध, सामान्यज्ञान स्पर्धेत कायम विजेता असायचा. राज्यस्तरीय अनेक स्पर्धांतून त्याने शाळेचे नेतृत्वही केले होते.

पालकत्व निभावताना... : हारी बाजी को जितना जिसे आता है

sakal_logo
By
आशिष तागडे

ऋत्विक कालपासून नाराज असल्याचे आई माधुरीच्या लक्षात आले होते. त्याची काल काहीतरी ऑनलाइन क्विझ कॉम्पिटिशन होती. गेल्यावर्षी वर्गात पहिला आल्याने यावेळी त्याची निवड झाली होती. तसा तो शाळेत वक्तृत्व, निबंध, सामान्यज्ञान स्पर्धेत कायम विजेता असायचा. राज्यस्तरीय अनेक स्पर्धांतून त्याने शाळेचे नेतृत्वही केले होते. दहावीनंतर त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले होते. बारावीचा चांगले गुण मिळाल्याने त्याला अपेक्षित कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता. आता त्याने पुन्हा विविध स्पर्धांमधून भाग घ्यायला सुरुवात केली होती आणि नेमक्या पहिल्याच स्पर्धेत त्याला अपयशाचा सामना करावा लागला होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुपारी जेवण झाल्यावर आईने त्याला सहज छेडले, ‘काय रे, काही झालं का, कालपासून तू गप्प गप्प आहेस.’ ‘काही नाही गं आई’, असे म्हणत त्यानं विषय टाळायचा प्रयत्न केला. परंतु त्याचा हात हातात घेत माधुरी म्हणाली, ‘बच्चू, मी तुझी आई आहे, माझ्याशी नको खोटं बोलूस’. आईच्या या आश्वासक अविर्भावापुढे ऋत्विकचे अवसान गळून पडले. नाराजीच्या सुरात म्हणाला, ‘काही नाही गं आई, काल एक ऑनलाइन क्वीझ कॉम्पिटिशन होती. कॉलेजच्यावतीने स्पर्धेसाठी माझी निवड केली होती. मुंबई, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक आदी ठिकाणचे संघ सहभागी झाले होते. मी तयारीही केली होती, परंतु यश नाही मिळाले. आता कॉलेजमध्ये काय सांगू? कॉलेजचा माझ्यावर खूप भरवसा होता.’

माधुरीच्या काय झाले ते लक्षात आले. ती त्याला म्हणाली, ‘मला एखाद्या अशा यशस्वी व्यक्तीचे नाव सांग, ज्याचा कधीच कोणत्याच स्पर्धेत पराभव झाला नाही. तुला कायम यशाचा आनंद घेण्याची सवय लागली आहे. कधीतरी पराभवाचा सामना करायला शिक. त्यातही वेगळा आनंद आहे. स्पर्धेसाठी तू खूप तयारी केलीस, मेहनत घेतलीस हे मान्य, परंतु तुझ्यापेक्षाही अन्य कोणी जास्त मेहनत घेतली असेल. आणि हे लक्षात ठेव दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकामुळेच पहिल्या क्रमांकाला महत्त्व असते. आयुष्यात अनेक स्पर्धांतून अयशस्वी झालेल्या व्यक्ती पुढे जाऊन त्याच क्षेत्रात दिग्गज झाल्याची असल्याची अनेक उदाहरणे आहेत. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांनी गायलेले पहिले गाणे चित्रपटातून काढून टाकल्याचे परवाच एका लेखात वाचले.

त्याचबरोबर आवाजाची पातळी योग्य नसल्याचे कारण देत अमिताभ बच्चन यांना रेडिओ केंद्राने नोकरी नाकारल्याचे सर्वश्रुत आहेच. त्यामुळे एका स्पर्धेत बक्षीस नाही मिळाले, नंबर नाही नाही आला म्हणून इतके नाराज व्हायचे काहीच कारण नाही. आणि आता स्पर्धेचा स्तर उंचावला जाणार आहे, त्यामुळे अधिक मेहनतीची तयारी ठेव. पाच गोष्टी लक्षात ठेव..

पाच गोष्टी महत्वाच्या

  • कायम स्वतःशीच स्पर्धा करायची.
  • कोणतीही स्पर्धा ही व्यक्तिमत्त्व विकासासाठी पोषक असते.
  • स्पर्धेचा निकाल काहीही येवो, आपण स्पर्धेत सहभागी झालो हे महत्त्वाचे.
  • पुढील स्पर्धेसाठी नव्या जोमाने कायम तयारी करायची.
  • आजचे अपयश ही पुढील यशाची नांदी समजायची...

माधुरी बोलत होती...आणि ऋत्विक ऐकतच राहिला...‘आई, माझे टेन्शन किती हलके केलेस....ये उम्मीद है, ये विश्‍वास है, मै फिर मुस्कारुंगा..चल आई आज मस्तपैकी आइस्क्रीम खायला जाऊयात..’

Edited By - Prashant Patil

loading image