ब्युटी टिप्स : मेकअप करताय? हे लक्षात ठेवा!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

मैत्रिणींनो, कधी कोणत्या समारंभासाठी किंवा इतर कोणत्या कारणाच्या निमित्ताने मेकअप आपल्याला करायला लागतो. हा मेकअप करताना या काही टिप्स लक्षात ठेवा.

मैत्रिणींनो, कधी कोणत्या समारंभासाठी किंवा इतर कोणत्या कारणाच्या निमित्ताने मेकअप आपल्याला करायला लागतो. हा मेकअप करताना या काही टिप्स लक्षात ठेवा. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

  • चेहरा धुतल्यानंतर किंवा मॉइश्चरायझर लावल्यानंतर लगेच मेकअप सुरू करा. मध्ये खूप वेळ जाऊ देऊ नका. मेकअप करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुतलेला असावा. त्यासाठी चांगला फेसवॉश वापरावा.
  • मेकअपची सगळी साधनं आधीपासूनच तयार ठेवावीत. वस्त्रे परिधान करण्यापूर्वीच मेकअप करणे केव्हाही चांगले.
  • फाउंडेशन ही गोष्ट मेकअपमध्ये खूप महत्त्वाची. त्याकडे अनेक जणी नीट लक्ष देत नाहीत. हे फाउंडेशन अतिशय व्यवस्थित लावावे. ते शक्यतो चांगल्या कंपनीचेच वापरावे.
  • फाउंडेशन लावल्यावर पावडरचा हलका पफ फिरवावा, त्यानंतर डोळ्यांचा मेकअप करावा.
  • मेकअप करताना लिक्विड फाउंडेशनचा एकच थर चेहऱ्यावर लावला जातो. तो अर्ध्या-पाऊण तासात कमी होतो. नंतर चेहरा मेकअप न केल्यासारखा दिसू लागतो. त्यामुळे दिवसभर बाहेर राहणाऱ्यांनी फाउंडेशनचे दोन-तीन थर चेहऱ्यावर लावावेत. त्यावर कॉम्पॅक्‍ट पावडर लावल्यास दिवसभर मेकअप चांगला राहतो.
  • रोजच्या रोज मेकअप करताना फाउंडेशन, ब्लशर, लिपस्टिक ही सौंदर्यप्रसाधने वापरावीत.
  • आय लायनर हे शक्यतो तुम्हाला व पोशाखाला शोभले पाहिजेत. त्यामुळे रंगांची निवड अतिशय काळजीपूर्वक करा.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article on beauty tips on makeup

Tags
टॉपिकस
Topic Tags: