Video : आईशी संवाद : बाळाच्या आहाराचे नियम

डॉ. अमोल अन्नदाते, बालरोगतज्ज्ञ
Friday, 14 February 2020

बाळाला पूरक आहार सुरू करताना काही मूलभूत गोष्टी आणि नियम लक्षात घ्यावेत.

 • बाळाचा आहार हा पूर्ण कुटुंब जे रोज खाते, त्यातूनच असावा.
 • आहार हा कधीही पाण्यासारखा पातळ असू नये. पूरक आहार हा घट्ट असावा.
 • कमी अन्नात जास्त उष्मांक निर्माण करण्यासाठी त्यात काही थेंब तेल किंवा तूप टाकावे.
 • एकदा पूरक आहार सुरू केल्यावर आधी वरचे अन्न व मगच स्तन्यपान अशी सवय लावावी. 
 • ६ ते ८ महिन्यांपर्यंत २ ते ३ वेळा, ९ महिन्यांनंतर ३ ते ४ वेळा आणि १२ महिन्यांनंतर बाळाला भूक लागेल तसा आहार द्यावा. 
 • बाळाच्या पहिल्या वाढदिवसानंतर बाळ आपल्या ताटात जेवले पाहिजे, म्हणजे घरात सगळ्यांसाठी बनवलेले अन्न त्याने खायला हवे.

पूरक आहार देताना लक्षात ठेवण्याचे मुद्दे
1) एकावेळी एकाच प्रकारचे अन्न द्या. पहिल्या प्रकारच्या अन्नाची सवय झाल्यानंतर दुसऱ्या प्रकारचे अन्न सुरू करा.
2) प्रथम चमचाभर देऊन हळूहळू त्याचे प्रमाण वाढवा. त्यामुळे तो पदार्थ बाळाला नीट पचतो आहे किंवा नाही हे समजू शकते.
3) बाळ एक वाटीभर अन्नपदार्थ घेईल तेव्हा एक वेळचे दूध बंद करा.
4) बाळाच्या आवडी-निवडीचा विचार करा. तुमच्या मताप्रमाणेच बाळाने अन्न खायला पाहिजे हा आग्रह सोडा.
5) बाळाची भूक ही दररोज दरवेळी सारखीच न राहता बदलत असते. विशेषतः सर्दी झाल्यास किंवा दात येण्याच्या सुमारास किंवा उन्हाळ्याच्या दिवसांत बाळाची भूक कमी होऊ शकते.
6) बाळाला आहार कधीही झोपून पाजू नये, त्यामुळे कधी कधी अन्न श्वासनलिकेतून छातीत जाऊन फुफ्फुसदाह होऊ शकतो.
7) तुम्ही ८ ते ९ महिन्यांच्या बाळास सूप, फळांचा रस इत्यादी पाजण्यासाठी ‘सिपर’चा वापर करू शकता. झाकण असलेल्या अशा चोचीच्या पेल्याने बाळ बसून पिऊ शकते. सिपर ही पेल्याची सुधारित आवृत्ती आहे. झाकण असल्यामुळे त्यातून द्रवपदार्थ सांडत नाही.
8) बाजारात उपलब्ध असलेल्या डब्यातील पावडर धान्यात शिजवून पीठ करून दूध मिश्रित केलेले असते. त्याचा एकच फायदा म्हणजे या शिजवाव्या लागत नाहीत. त्यांचा वापर आपण लांबच्या प्रवासामध्ये बाळाला देण्यासाठी करू शकतो, अन्यथा अशा महागड्या पावडरचा वापर दररोज पूरक आहारासाठी करण्याची गरज नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हे लक्षात ठेवा 
नवीन अन्नपदार्थ दिल्यानंतर बाळाला त्याची ॲलर्जी असल्यास २४ तासांच्या आत पुढील लक्षणे दिसू शकतात. 

 • त्वचेवर लालसर पुरळ (रॅश) येणे. 
 • दम लागणे, खोकला सुरू होणे.
 • उलट्या व जुलाब होणे.

अशी अॅलर्जीची लक्षणे लक्षात आल्यास तो अन्नपदार्थ बंद करावा व त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अंड्याची ॲलर्जी मोठ्या प्रमाणावर आढळते. त्यामुळे अंडे सुरू करायचे असल्यास अंडे उकडून प्रथम त्यातली थोडासा पिवळा बल्क देऊन पाहावा. अॅलर्जीची वरील लक्षणे न दिसल्यास पिवळ्या रंगाचे प्रमाण वाढवावे, त्यानंतर पांढरा भाग चालू करावा. कधीही कच्चे अंडे फेटून बाळाला देऊ नये.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr amol annadate on Baby Diet Rules