आईशी संवाद - मुलांची अंथरुणात लघवीची सवय 

Child
Child

मुल अंथरुणात लघवी करत आहे का, हे समजण्यासाठी ३ ते 4 वर्षांदरम्यान रात्री झोपताना डायपर घालण बंद करावे व या सवयीचा अंदाज घ्यावा. भारतात ५ वर्षांपुढील ७.५ ते १६.५ टक्के मुलांना ही सवय आहे. कुमारवयीन मुलांमध्ये हे प्रमाण ३ टक्के आहे, मात्र हे प्रमाण फक्त रुग्णालयात आलेल्यांचे आहे. उपचार न घेणाऱ्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. मुलांमध्ये हे प्रमाण मुलींपेक्षा जास्त आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दखल कधी घ्यावी?
मुल सहसा ५ वर्षांपर्यंत अंथरूण ओले करते. यानंतर सलग तीन महिने, महिन्यातून एकदा अंथरूण ओले करत असल्यास त्याची दखल घेऊन उपचार करण्याइतपत ही समस्या आहे, असे समजावे. याला पाचवर्षांपर्यंत उपचारांची गरज नसते. तरीही ५ वर्षांच्या आधीही सवय असल्यास तिसऱ्या वर्षापासून जमेल तसे औषध न देता लघवी करण्याच्या सवयीची शुचिता – संहिता मुलाला समजून सांगण्यास सुरुवात करायला हवी व ही सवय ५ वर्षापर्यंत जाईल यासाठी प्रयत्नशील राहायला हवे.

सवयीचे परिणाम
या सवयीचे मानसिक परिणाम पालक व पाल्य दोघांवर होतात. पालकांची रात्री झोपमोड होऊन चीडचीड व दुसऱ्या दिवशी कामावर परिणाम होतोच. या शिवाय मुलांमध्ये लाज वाटणे, अपराधीपणाची भावना निर्माण होणे, भीती आणि नैराश्य व हतबद्धतेची भावना निर्माण होते. यामुळे त्यांच्या अभ्यासावर व इतर क्षमतांवर परिणाम होतो.संशोधन सांगते, आपल्या पूर्ण आयुष्यात मनाला त्रासदायक गोष्टींपैकी घटस्फोट, आई-वडिलांची तीव्र भांडणे यांनतर अंथरुणात लघवी करणे मोठे कारण असते.

अंथरुणात लघवी करणाऱ्या मुलांचे प्रकार 
यात दोन प्रकारे वर्गीकरण करता येते 

  • जे फक्त रात्रीच अंथरूण ओले करतात.
  • जे रात्री व दिवसाही झोपल्यास अंथरूण ओले करतात.

दुसऱ्या प्रकारात वर्गीकरण करताना 

  • फक्त अंथरूण ओले करण्याची सवय असलेले.
  • या सोबत लघवी मार्गाच्या संसर्गाची लक्षणे व लघवी लागल्यास स्वच्छतागृहात जाईपर्यंत थांबता न येणे, वारंवार लघवी होणे अशी लक्षणे असतात.
  • लहानपणापासून नेहमीच अंथरूण ओले करत होते. - प्रायमरी 
  • आधी ६ महिने अंथरूण ओले करत नव्हते, पण नंतर करू लागले. - सेकंडरी

उपचारापूर्वी
एक ते तीन महिन्याची लघवीची डायरी आधी मेंटेन करावी. यात झोपण्याची आणि उठण्याची वेळ , किती दिवस दिवसा व रात्री अंथरुणात लघवी केली, दिवसभर किती पाणी प्यायले, रात्री झोपण्याअगोदर किती पाणी प्यायले, सकाळी उठल्यावर किती लघवी होते, बाळ डायपर घालत असल्यास सकाळी ओल्या डायपरचे व डायपर घालताना कोरड्या डायपरचे वजन याची नोंद ठेवावी. यावरूनच उपचाराची दिशा ठरते.

कारणे

  • वाढ व विकासातील अडथळे व समस्या.
  • जनुकीय कारणे – पालक लहानपणी अंथरुणात लघवी करत असतील, तर त्यांच्या मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त असते.
  • मानसिक तणाव – आत्मसन्मान कमी असणे ( सेल्फ इस्टीम ), नैराश्य 
  • जन्मतः मूत्राशयाची लघवी साठवून ठेवण्याची क्षमता कमी असणे.
  • लघवी होऊ नये म्हणून शरीरात स्रवणारा संप्रेरक अँटी डाययुरॅटीक हार्मोनची कमतरता.
  • झोपेच्या समस्या  
  • अतिचंचलता 
  • बद्धकोष्टता
  • टॉन्सील व अॅडीनॉईड मुळे झोपताना श्वास अडखळणे
  • जंत असणे

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com