esakal | वुमन हेल्थ : महिलांच्या स्वास्थाविषयी...
sakal

बोलून बातमी शोधा

women-health

महिला दिन... महिलांचे कोडकौतुक करण्याचा, सत्कार करण्याचा, पूजा करण्याचा एक दिवस! फक्त एवढेच? हा दिवस असला पाहिजे जाणीव जागृतीचा! स्त्रियांचे हक्क, खास करून स्वास्थ्यविषयक हक्क आणि जाणिवा जागृत करण्याचा! आजही आरोग्यविषयक अनेक प्रश्‍न स्त्रियांना सतत भेडसावत आहेत.

वुमन हेल्थ : महिलांच्या स्वास्थाविषयी...

sakal_logo
By
डॉ. ममता दिघे

महिला दिन... महिलांचे कोडकौतुक करण्याचा, सत्कार करण्याचा, पूजा करण्याचा एक दिवस! फक्त एवढेच? हा दिवस असला पाहिजे जाणीव जागृतीचा! स्त्रियांचे हक्क, खास करून स्वास्थ्यविषयक हक्क आणि जाणिवा जागृत करण्याचा! आजही आरोग्यविषयक अनेक प्रश्‍न स्त्रियांना सतत भेडसावत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

स्त्रियांच्या काही प्रमुख आरोग्यविषयक समस्या
1) कर्करोग

स्तनांचा आणि गर्भाशयमुखाचा कर्करोग हे दोन प्रश्‍न स्त्रियांपुढे सतत उभे आहेत. हे दोन्ही प्रकार वेळेवर लक्षात आल्यास त्यावर उपचार होतील, त्यामुळे स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाण निश्‍चितपणे कमी होईल. 

2) प्रजनन आरोग्य 
प्रजनन आरोग्य नीट नसल्यामुळे १५ ते ४४ वयोगटातल्या अनेक स्त्रियांचे आरोग्य धोक्यात येते. गर्भनिरोधक उपायांची माहिती करून घेणे, योनीमार्गाच्या संसर्गाची काळजी घेणे आवश्यक आहे. विकसनशील देशांत गर्भनिरोधाचे योग्य उपाय मुलींपर्यंत पोचतच नाहीत, त्यामुळे त्यांना आरोग्याची काळजी घेता येत नाही. 

3) प्रसूतीदरम्यानचे आरोग्य
गर्भावस्था आणि प्रसूती या काळात स्त्रियांना सध्या बऱ्या सुविधा मिळत आहेत. खेड्यात आणि दुर्गम भागात अजूनही यात सुधारणा नसल्याने, यामुळे मृत्यू होत आहेत. 

4) लैंगिक आजार
असुरक्षित संबंधांमुळे पसरणाऱ्या एचआयव्ही, एचपीव्हीसारख्या आजारांवर स्त्रियांना सहजपणे उपचार मिळत नसल्याने त्यामुळे होणारे आजार रोखण्यात अपयश येते. 

5) हिंसाचार
अनेक महिलांना शारीरिक आणि लैंगिक अत्याचारांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे त्यांच्या तत्कालीन आणि दीर्घकालीन आरोग्यावर वाईट परिणाम होतात.

6) मानसिक स्वास्थ्य
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना चिंता, उदासीनता यांसारखे विकार जास्त होतात. त्यांना अशा अवस्थेत आधार, समुपदेशन मिळण्याची आवश्यकता असते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास कायम राहील. 

7) अन्य आजार
हृदयरोग, मधुमेह, स्थूलता किंवा तंबाखू, दारू, यामुळे होणारे आजार, या सर्वांचा स्त्रियांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. लहान वयापासून तरुणींना निरामय जीवनशैलीची सवय लागली तर त्यांचे आरोग्य आणि आयुष्यमान नक्की उंचावेल. 

8) पौगंडावस्थेतल्या समस्या
कोवळ्या वयातल्या अनेक मुली लैंगिक आजार आणि अवेळी गर्भधारणेने ग्रस्त आहेत. कमी वयात गर्भधारणा, गर्भपात किंवा प्रसूती झाल्याने स्त्रियांना खूप त्रास होतो आणि पुढेही दीर्घकाळ त्यांचे स्वास्थ्य बिघडत राहते. 

9) वार्धक्य
स्वतः पैसे कमावत नसल्याने अनेक स्त्रियांना पेन्शन, इतर लाभ किंवा आरोग्य सेवा आणि समाजसेवी संस्थांकडून मदत मिळत नाही. यात दारिद्र्य असेल तर अशा वृद्ध स्त्रियांचे खूप हाल होतात. अनेक स्त्रियांना अजूनही या सोयींचा लाभ घेण्याची संधी मिळत नाही. आपला सतत हाच प्रयत्न असला पाहिजे, की प्रत्येक स्त्रीला ती असेल तिथे एक चांगले, सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण जीवन मिळावे!

loading image