किचन+ : डम्पलिंग मेकर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

सध्या जुनेच पदार्थ नवा साज घेऊन स्वयंपाकघरात प्रवेश करू लागले आहेत. पदार्थांची पारंपरिक चव, मात्र बनवण्याची पद्धत थोडी हटके, लहान मुलांना सहज आकर्षिक करून घेईल अशी केल्यास मुले त्यावर तुटून पडतात. मोमोज, डम्पलिंग हे त्यातलेच काही पदार्थ. विविध भाज्या, चिकन, खिमा, मटणासारखे पदार्थ मुले सहज खात नाहीत.

सध्या जुनेच पदार्थ नवा साज घेऊन स्वयंपाकघरात प्रवेश करू लागले आहेत. पदार्थांची पारंपरिक चव, मात्र बनवण्याची पद्धत थोडी हटके, लहान मुलांना सहज आकर्षिक करून घेईल अशी केल्यास मुले त्यावर तुटून पडतात. मोमोज, डम्पलिंग हे त्यातलेच काही पदार्थ. विविध भाज्या, चिकन, खिमा, मटणासारखे पदार्थ मुले सहज खात नाहीत. त्यांना ते आकर्षक आकारात, सजवून दिल्यास मात्र त्यांच्या उड्या पडतात! पारंपरिक मोदकासारखा दिसणारा, मात्र त्यात अनेक प्रकारचे सारण (अगदी नॉनव्हेजही) असलेला मोमोज हा पदार्थ टीन एजर्स व युवकांच्या पसंतीस उतरला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डम्पलिंग हाही असाच आवडीचे सारण भरून करण्याचा पदार्थ, आपल्या पांरपरिक गोड करंज्या, मटार करंज्या किंवा सामोसा या अंगाने जाणारा. हे पदार्थ करताना सारण भरून त्याला न फुटू देता विशिष्ट आकार देणे, हे तसे कौशल्याचे काम. यासाठी बाजारात उपलब्ध डम्पलिंग मेकर तुमच्या मदतीला येऊ शकतो. कणिकेची पारी बनवून त्यात सारण भरायचे आणि या मशिनमध्ये टाकून दाब देतात छान आकाराचे डम्पलिंग तयार. 

असा आहे डम्पलिंग मेकर

  • पूर्ण स्टेनलेस स्टीलची बॉडी.
  • एकाच आकाराचे पॉकेट बनत असल्याने पदार्थ दिसायला छान.
  • मशिनमध्ये पारी ठेवून त्यावर सारण ठेवायचे व वरून केवळ दाब द्यायचा असल्याने कमी वेळेत आणि कमी श्रमांत डम्पलिंग बनवणे शक्य. 
  • डिशवॉशर सेफ व स्वच्छ करायला सोपा.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article on Dumpling maker

Tags
टॉपिकस
Topic Tags: