जोडी पडद्यावरची : एक ‘म्युझिकल’ प्रवास

गुरू रंधावा -ध्वनी भानुशाली
Saturday, 10 October 2020

आजकाल यू-ट्यूबसारख्या माध्यमातून विविध प्रकारची गाणी लोकप्रिय होत आहेत आणि त्यात अर्थातच नव्या पिढीतील अनेक लोकप्रिय पॉपसंगीत गाणाऱ्यांचा देखील महत्त्वाचा वाटा आहे. टी-सीरिजतर्फे ‘बेबी गर्ल’ या प्रेमगीताचा व्हिडिओ यू-ट्यूबवर नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि त्यानिमित्तानं प्रसिद्ध गायक गुरू रंधावा आणि गायिका ध्वनी भानुशाली एकत्र आले आहेत. दोन आठवड्यांतच या व्हिडिओनं साडेतीन कोटी व्ह्यूजचा टप्पा ओलांडला आहे.

आजकाल यू-ट्यूबसारख्या माध्यमातून विविध प्रकारची गाणी लोकप्रिय होत आहेत आणि त्यात अर्थातच नव्या पिढीतील अनेक लोकप्रिय पॉपसंगीत गाणाऱ्यांचा देखील महत्त्वाचा वाटा आहे. टी-सीरिजतर्फे ‘बेबी गर्ल’ या प्रेमगीताचा व्हिडिओ यू-ट्यूबवर नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि त्यानिमित्तानं प्रसिद्ध गायक गुरू रंधावा आणि गायिका ध्वनी भानुशाली एकत्र आले आहेत. दोन आठवड्यांतच या व्हिडिओनं साडेतीन कोटी व्ह्यूजचा टप्पा ओलांडला आहे. हे प्रेमगीत गुरू रंधावा यानं स्वतःच लिहिलं आहे. गुरू आणि ध्वनी यांनीच ते गीत गायले असून, हा म्युझिक व्हिडिओ त्यांच्यावरच चित्रित झाला आहे. रेमो डिसूझा यांनी या म्युझिक व्हिडिओची कोरिओग्राफी आणि दिग्दर्शन केलं आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुरू आणि ध्वनी यांची पहिली भेट झाली होती ती २०१८ मध्ये. ‘इशारे तेरे’ हा म्युझिक व्हिडिओ देखील गुरू आणि ध्वनी यांच्यावरच चित्रित झाला होता आणि या दोघांनी ते गीत गायलं होतं. गुरू रंधावा म्हणतो, ‘‘आमच्या ‘बेबी गर्ल’ या नव्या म्युझिक व्हिडिओचं चित्रीकरण करण्यास आम्ही खूप उत्सुक होतो. मुख्य म्हणजे, रेमो डिसूझा यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास मी उत्सुक होतो. ध्वनीला मी चांगला ओळखत होतोच आणि ती एक उत्तम गायिका असून, कोणत्याही भाषेतील गाण्यासाठी ती खूप मेहनत घेते. हे गाणे ध्वनी उत्तमच गाणार असा मला पूर्ण विश्वास होता आणि हे गाणं तिनं उत्तमच गायलं आहे.’’

ध्वनी म्हणते, ‘‘गुरू लोकप्रिय गायकाबरोबरच उत्तम संगीतकार देखील आहे. त्यानं मला ‘बेबी गर्ल’ हे गीत पाठवलं, तेव्हा मला खूप आनंद झाला. गुरू उत्साही आहे आणि एक उत्तम माणूसदेखील आहे. हे गीत गाताना आणि अर्थातच या गाण्याचे चित्रीकरण करताना एक संगीतमय प्रवास आम्हाला अनुभवता आला.’’

लॉकडाउनच्या काळात गुरूनं अनेक प्रकारची गाणी ऐकली तसेच अनेक गाणी लिहिलीसुद्धा. त्याचबरोबर व्यायामावर लक्ष केंद्रित करून स्वतःचं वजन कमी देखील केलं. विविध गाणी लिहून चाहत्यांना सातत्यानं नवनवीन गाण्यांचा आनंद कसा देता येईल, याचा गुरूनं विचार केला. ध्वनीनं लॉकडाउनच्या काळात स्वतःच्या कुटुंबासाठी वेळ दिला तसेच घरच्या घरी काही गाण्यांची रेकॉर्डिंग्ज करून पाठवली. ऑनलाइनच्या माध्यमातून काही गाण्यांचं सादरीकरण देखील केलं. गुरू आणि ध्वनी या दोघांकडूनही अशीच नवनवीन गाणी विविध प्रोजेक्ट्समधून आपल्याला येत्या वर्षात ऐकायला नक्की मिळतील.
(शब्दांकन : गणेश आचवल)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article guru and dhwani