esakal | ग्रुमिंग + : स्टाइलिश केसांसाठी हेअर स्कार्फ
sakal

बोलून बातमी शोधा

hair scarf

केस लहान असो किंवा मोठे, त्यांना सांभाळणे एक मोठे कामच असते. शिवाय दररोज हेअरस्टाइल करणेही शक्य नाही. कुरळे, सरळ, लहान, मोठे अशा कोणत्याही प्रकारच्या केसांची वेगवेगळ्या पद्धतीने हेअरस्टाइल करण्यासाठी हेअर स्कार्फची मदत होते.

ग्रुमिंग + : स्टाइलिश केसांसाठी हेअर स्कार्फ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

केस लहान असो किंवा मोठे, त्यांना सांभाळणे एक मोठे कामच असते. शिवाय दररोज हेअरस्टाइल करणेही शक्य नाही. कुरळे, सरळ, लहान, मोठे अशा कोणत्याही प्रकारच्या केसांची वेगवेगळ्या पद्धतीने हेअरस्टाइल करण्यासाठी हेअर स्कार्फची मदत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काय आहे हेअर स्कार्फ?
हेअर स्कार्फ यापूर्वी तुम्ही अनेकदा चित्रपटांमधून, जाहिरातींमधून पाहिला असेल. हेअर स्कार्फ हा इतर कोणत्या स्कार्फसारखा नसून, आकाराने लहान आणि सळसळीत कापडाचा असतो. या स्कार्फच्या मदतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे हेअरस्टाइल करू शकता. हेअर स्कार्फची फॅशन काहीशी जुनी असली, तरी पुन्हा एकदा यू-ट्यूबर्स, फॅशनमध्ये आणि मॉडेल याचा वापर करताना दिसत आहेत.

  • हेअर स्कार्फ सळसळीत असल्याने केस खराब होत नाहीत. बॅंड किंवा रबरप्रमाणे केस घट्ट न राहता सैलसैर राहतात.
  • कोणत्याही आउटफिटवर ट्रेंडी लुक देणारा असा हा स्कार्फ आहे.
  • रबर लावूनही केस वारंवार चेहऱ्यावर येतात. अशावेळी हेअर स्कार्फ लावून संपूर्ण केस बांधता येतात.
  • उन्हाळ्यात आर्द्रतेमुळे केस खराब होतात तर, पावसाळ्यातही केसांना ओलसरपणा असतो. अशावेळी केस घट्ट न बांधता सैलसैर ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी हेअर स्कार्फची मदत होऊ शकते.
  • स्कार्फसह वेणी, बन, हाल्फ अप हेअर, हेअर बेल्ट, टाय, कव्हर अप, पोनीटेल अशा विविध स्टाइल करू शकता.