किचन गॅजेट्स : फ्रेंच फ्राईज कटर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

french fries cutter

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता खाद्यप्रकार म्हणजे फ्रेंच फ्राईज.

किचन गॅजेट्स : फ्रेंच फ्राईज कटर

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता खाद्यप्रकार म्हणजे फ्रेंच फ्राईज. मात्र, दरवेळी फ्रेंच फ्राईज खायचे म्हटले, की कॅफेत जाऊन आस्वाद घ्यावा लागतो किंवा ऑनलाईन मागवावे लागतात. परंतु, हल्ली फ्राईज बाहेरून मागवण्याऐवजी घरच्या घरीदेखील करता येतात. फ्रेंच फ्राईज करताना, बटाट्याचे आयताकृती काप करताना भरपूर वेळ खर्ची होतो.

मोठ्या प्रमाणावर फ्राईज बनवायचे असल्यास, ही प्रक्रिया जास्तच कंटाळवाणी ठरते. परंतु, फ्रेंच फ्राईज कटरच्या साहाय्याने, हे काम अतिशय सोपे होते. या फ्राईज कटरची निवड करताना त्याची वैशिष्ट्ये माहिती असावीत, त्याचे ब्लेड्स शार्प असावेत. हे फ्राईज मेकर बाजारात विविध प्रकारात उपलब्ध आहेत. प्लास्टिक फ्राय कटर, क्रिंकल फ्रेंच फ्राईज कटर, स्टेनलेस स्टील पोटॅटो कटर आदी. प्रकारांपैकी तुम्ही आपल्या आवडीनुसार, फ्रेंच फ्राईज कटरची निवड करू शकता.

फ्रेंच फ्राईज कटरची वैशिष्ट्ये

  • या फ्रेंच फ्राईज कटरच्या सह्याने अगदी काही सेकंदांतच बटाट्याचे आयताकृती काप करता येतात.

  • स्वच्छ करण्यास कोणतीही अडचण येत नाही. फ्रेंच फ्राय कटर उत्तम दर्जाच्या, प्रोफेशनल ग्रेड स्टेनलेस स्टील मटेरियलने बनवलेले आहे. ब्लेड आणि कटर बॉडी स्टेनलेस स्टीलची असल्याने गंजरोधक आहे. त्याचे पार्ट्‌स रिमूव्हेबल असल्याने वापरात नसताना वेगळे करूनही ठेवता येते.

  • क्रिंकल फ्राय कटर स्टेनलेस स्टीलच्या ब्लेडपासून बनवलेले असते आणि त्यात लाकडी हँडल असते. या कटरच्या साहाय्याने, वॉफल फ्राईज, पिकल चिप्स देखील करता येतात. शिवाय काही भाज्या, फळेदेखील कापता येतात.

  • या कटरच्या साच्यात बटाटा टाकल्यावर त्याला वरून हाताने हँडलवर दाब दिल्यावर त्यात असणाऱ्या कटरने, काही मिनिटांत फ्रेंच फ्राईज कापून रेडी होतात. या कटरच्या साह्याने, गाजराचेदेखील चांगले काप करता येतात.

Web Title: Article Kitchen Gadgets French Fries Cutter

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :kitchenarticle
go to top