किचन गॅजेट्स : स्ट्रेनर सिलिकॉन क्लिप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

strainer silicone clip

पास्ता करताना किंवा कोणतीही गोष्ट उकडल्यानंतर त्यातलं पाणी निथळायचं असेल तर बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो. गाळण्यानं करावं म्हटलं तर ते छोटं असतं आणि चाळणीचा वापर करणंही अवघड जातं.

किचन गॅजेट्स : स्ट्रेनर सिलिकॉन क्लिप

पास्ता करताना किंवा कोणतीही गोष्ट उकडल्यानंतर त्यातलं पाणी निथळायचं असेल तर बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो. गाळण्यानं करावं म्हटलं तर ते छोटं असतं आणि चाळणीचा वापर करणंही अवघड जातं. अशा परिस्थितीत ‘ॲडजस्टेबल सिलिकॉन क्लिप फॉर पास्ता’ हे विशेष साधन उपयोगी पडतं. ही एक सिलिकॉन क्लिप असते. सिलिकॉन लीड असतात, तशाच प्रकारची; पण वेगळ्या आकारातली आणि गाळण्याचं काम करता येणारी ही क्लिप. ज्या भांड्यात किंवा पातेल्यात पास्ता किंवा तत्सम उकडलेला पदार्थ आहे, त्याला ही स्लिप ताणून बसवायची. त्यानंतर पातेलं व्यवस्थित उभं करून त्यातलं पाणी हळुवारपणे निथळता येतं. क्लिपमुळे पास्ता किंवा इतर गोष्टी खाली पडण्याची शक्यता नसते. शिवाय ते खूप गरम असलं तरी फार काही फरक पडत नाही. भाज्या निथळायला किंवा इतर गोष्टींसाठीही ही ॲडजस्टेबल सिलिकॉन क्लिप वापरता येते.

क्लिपची वैशिष्‍ट्ये

  • पास्ता आणि उकडलेले पदार्थ निथळणं अगदी सोपं.

  • पदार्थाचं तापमान कितीही असलं, तरी काही फरक पडत नाही. अगदी नाजूकपणे पदार्थ निथळून काढता येतो.

  • वापरायला आणि स्वच्छ करायला अगदी सोपी.

  • क्लिप कोणत्याही पातेल्याला किंवा भांड्याला बसवता येते.

  • क्लिप लहान असल्याने कुठेही ठेवता येते.

Web Title: Article Kitchen Gadgets Strainer Silicone Clip

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :kitchenarticle