esakal | वुमन हेल्थ : अवघड जागेचं दुखणं
sakal

बोलून बातमी शोधा

Women

1) लहानपणापासून, पुढून मागे अशा प्रकारे खासगी भाग साफ आणि कोरडे ठेवायची मुलींना सवय लावा.

2) खासगी भागाची स्वच्छता कोमट पाण्याने व सौम्य साबणाने करा.  सुती, सैलसर आरामदायक अंतर्वस्त्रे वापरा.

3) सुरक्षित संबंध ठेवा. हार्श रसायने असलेली उत्पादने वापरू नका. 

4) पाळीच्या वेळेला हायजिनिक पॅड वापरा. तरुणींमध्ये व्हजायनल हायजीनविषयी जागरूकता निर्माण करा.

वुमन हेल्थ : अवघड जागेचं दुखणं

sakal_logo
By
डॉ. ममता दिघे

मुलगी वयात आल्यावर तिला असे बसू नको, तसे करू नको अशा अनेक सूचना दिल्या जातात, मात्र काही गोष्टी आजही मोकळेपणाने बोलल्या जात नाहीत. त्यामुळेच सहज टाळता येण्यासारखी दुखणी मागे लागतात. स्त्रीत्वाचा एक महत्त्वाचा आणि नाजूक भाग म्हणजे योनीमार्ग. मुळातच नाजूक असल्याने या भागाला जपणे, स्वच्छ ठेवणे, संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेणे या गोष्टी प्राथमिकतेने सांगितल्या आणि केल्या गेल्या पाहिजेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

योनीमार्गाचा संसर्ग (vaginal infections) आणि त्यामुळे होणारा त्रास म्हणजे प्रामुख्याने डिस्चार्ज, खाज, झोंबणे आणि कधीकधी दुर्गंध! ही लक्षणे दिसली की, संसर्ग असेलच असे नाही; पण ही धोक्याची घंटा आहे. खाजेमुळे निद्रानाश, कामात लक्ष न लागणे, आतले अंग (vaginal folds) चिकटणे यासारख्या समस्यांना सुरुवात होऊ शकते.

व्हजायनल इन्फेक्शन बॅक्टेरियल, फंगल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सूक्ष्म जिवाणूंमुळे होऊ शकते. त्याच बरोबर केमिकल जास्त असलेले साबण वापरणे, बबल बाथ, कपडे धुण्याचे हार्श साबण, प्रमाणाबाहेर गर्भनिरोधक फोम किंवा जेली वापरणे, घट्ट, कृत्रिम तंतूंची अंतर्वस्त्रे वापरणे, खासगी भागाची नीट स्वच्छता न करणे, पाळीच्या आधी किंवा नंतर हार्मोनमध्ये बदल होणे, रजोनिवृत्तीनंतर योनीमार्ग पातळ आणि कोरडा होणे यांमुळे योनीमार्गाला इजा होऊन डिस्चार्ज आणि जळजळ होऊ शकते. हीच लक्षणे गंभीर स्वरूप घेऊन संसर्गाला आमंत्रण देऊ शकतात. दुखणे अंगावर न काढता, लक्षणे दिसताच डॉक्टरशी संपर्क साधा. अंतर्गत तपासणी, औषधोपचार, खाज कमी करण्यासाठी बाह्य उपचार घेऊन त्रास कमी करता येऊ शकतो. इन्फेक्शन कायमचे दूर ठेवण्याच्या या आहेत टिप्सः

loading image