आई माझे सर्वस्व...

Mansi-Naik
Mansi-Naik

मेमॉयर्स - मानसी नाईक, अभिनेत्री
प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणी जवळचे माणूस असते. आपल्या मनातील अनेक गोष्टी आपण त्यांच्याकडे शेअर करत असतो. कारण, आपल्या मनातील गोष्टी त्यांच्याजवळ व्यक्त केल्या की, आपलं मनही हलकं होतं. अशाच प्रकारे माझ्या जवळची सर्वांत महत्त्वाची अन् आवडती व्यक्ती म्हणजे माझी आई. खरंतर तिनेचं मला बोट धरून चालायला शिकविलं. चांगल्या-वाईट गोष्टींची जाणीव करून दिली. तिने प्रत्येक गोष्टीत मला प्रोत्साहन दिलं. त्यामुळेच ती माझी मैत्रीण आणि मार्गदर्शकही आहे. तिनेच मला लहानपणापासून शिस्तीचे धडे घालून दिले.

खरंतर माणसाचे विविध मुखवटे ओळखण्याची जबाबदारी आपलीच असते. त्यातील चांगल्या-वाईट गोष्टी ओळखता आल्या पाहिजेत. या गोष्टी मला आईनेच सांगितल्या. ती माझी सर्वस्व आहे. आपल्यासमोर अनेक आव्हाने असताना, ती कशी पार करावीत, अशा खडतर रस्त्यामधून वाट कशी शोधावी, हे मला आईनेच शिकविलं. आई नेहमीच म्हणते, आपण चित्रपट इंडस्ट्रीमध्ये पैसा कमवायला नव्हे तर पॅशनसाठी येथे आहोत.

त्यामुळे जोपर्यंत आपण या क्षेत्रामध्ये आहोत, तोपर्यंत १०० नव्हे, तर १०१ टक्के योगदान दिलं पाहिजे. जीव ओतून काम केलं पाहिजे. आपल्याला या क्षेत्राचा कंटाळा येईल किंवा आपल्याला थांबायचं असेल, त्या वेळी आपण थांबायलाच पाहिजे. 

मी पहिल्यापासूनच जिद्दी आहे. ती मला वडिलांकडूनच मिळाली आहे. त्यातच आमच्या घरामध्ये शिस्तीचं वातावरण आहे. कारण, माझी आई डिफेन्समध्ये कार्यरत होती.

मुळातच ती पहिल्यापासून शिस्तीला धरून होती. शिस्त मोडलेली तिला अजिबात आवडत नव्हती. त्यामुळे ती उंचीबरोबर कर्तृत्वानेही मोठी आहे. आपल्या कामामधूनच तिने ही उंची गाठली आहे. तिचाच आदर्श घेऊन मी मार्गक्रमण करत आहे. आगामी काळात मला अभिनयामध्ये आणखीही मोठा पल्ला गाठायचा आहे. आई-वडिलांचं नाव मोठं करायचं आहे. आणि या गोष्टी मी माझ्या कामातूनच दाखवून देणार आहे. कारण, मला सर्वच गोष्टी जिद्द अन् मेहनतीचे करायला आवडतात. आपण ज्या गोष्टींमध्ये जीव ओतून काम करतो, ती गोष्ट चांगली झाल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे सर्वांनीच प्रत्येक गोष्टीमध्ये जीव ओतून काम केलं तर त्याला यश आल्याशिवाय राहणार नाही. 
(शब्दांकन - अरुण सुर्वे)

माझे घर
आपल्या घरात असतो आपण खास सजवलेला कोपरा. आपल्या भावभावनांशी जोडलेला. अशा कोपऱयांनी सजतं घर. शेअर करा हा कोपरा. सजवलेलं आपलं घर. फोटोंसह.

माझी रेसिपी
खायला आणि खाऊ घालायला तुम्हाला आवडतं का? मग शेअर करा तुमची आवडती रेसिपी...फोटोंसह...
व्हॉटस्ॲप- ९१३००८८४५९
email :  maitrin@esakal.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com