masher-and-whisker
masher-and-whisker

किचन + : मॅशर आणि विस्कर

लॉकडाउनचा काळ आणि घरगुती पदार्थ बनविण्याची घराघरांत सुरू असलेली लगबग या बद्दल आपण या सदरात अनेकदा चर्चा केली. हॉटेलसारखे पदार्थ घरात बनवताना चवीबरोबरच महत्त्वाची ठरते प्रक्रिया. ही प्रक्रिया करतानाची उपकरणे घरात उपलब्ध नसल्यास पदार्थ चवीला परफेक्ट बनतो, मात्र टेक्श्‍चरमध्ये मात्र मार खातो! म्हणजेच घरात पावभाजी बनवताना बटाट्यासह सर्व भाज्या नीट मॅश न झाल्यास चवदार भाजी दिसायला मात्र ओबडधोबड होते. हीच गत अंड्यांचे पदार्थ बनवतानाही होते. अंडे फोडून आपण चमच्याने स्टीलच्या भांड्यात फेटतो (व्हिस्क).

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या प्रक्रियेत अंड्यात घातलेले तिखट, मीठ, मसाला नीट एकत्र न झाल्यास ऑम्लेटसारखा पदार्थ करताना त्यात यांच्या गाठी दिसून येतात आणि चवदार ऑम्लेट हॉटेलसारखे दिसत नाही. या दोन्ही समस्या सोडविण्यासाठी ऑनलाइन मार्केटमध्ये यांचे कॉम्बो पॅकेज उपलब्ध आहे. या दोन्ही उपकरणांच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी पावभाजी आणि अंड्याचे विविध पदार्थ अगदी हॉटेलप्रमाणे बनवू शकता. 

असा आहे मॅशर आणि विस्कर
1) मॅशर व विस्कर स्टेनलेस स्टील मटेरिअलमध्ये असल्याने सुरक्षित.
2) विशिष्ट प्रकारच्या मॅशर बेसमुळे बटाटे आणि भाज्या व्यवस्थित,
3) एकसमान मॅश करणे शक्य.
4) विस्करच्या हेवी हॅंडलमुळे अंडे फेटणे सोपे जाते.
5) दोन्ही उपकरणे साफ करायला सोपे आणि डिशवॉशर सेफ.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com