esakal | ग्रुमिंग + : नेल आर्ट मशिन
sakal

बोलून बातमी शोधा

Nail-Art-Machine

आपल्या शरीराचा सर्वांत आकर्षक भाग म्हणजे आपली बोटे! त्यात ती लांबसडक असली, की आणखीनच आकर्षक दिसतात. लांबसडक नसली, तरी त्यांना आकर्षक बनवण्याचे असंख्य पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यसाठी प्रथम तुमच्या हातांचे मॅनिक्युअर करून घ्या. यामुळे हात लुकलुकीत आणि टॅनमुक्त होईल. आता बोटाच्या नखांवर लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्ही एरवी प्लेन नेलपेंट लावत असाल, मात्र आता काहीतरी हटके पर्याय अवलंबण्याची गरज आहे. त्यासाठी नेल आर्टचा पर्याय तुम्ही वापरू शकता.

ग्रुमिंग + : नेल आर्ट मशिन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आपल्या शरीराचा सर्वांत आकर्षक भाग म्हणजे आपली बोटे! त्यात ती लांबसडक असली, की आणखीनच आकर्षक दिसतात. लांबसडक नसली, तरी त्यांना आकर्षक बनवण्याचे असंख्य पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यसाठी प्रथम तुमच्या हातांचे मॅनिक्युअर करून घ्या. यामुळे हात लुकलुकीत आणि टॅनमुक्त होईल. आता बोटाच्या नखांवर लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्ही एरवी प्लेन नेलपेंट लावत असाल, मात्र आता काहीतरी हटके पर्याय अवलंबण्याची गरज आहे. त्यासाठी नेल आर्टचा पर्याय तुम्ही वापरू शकता.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नेल आर्ट करून घेण्यासाठी बाजारात असंख्य स्टुडिओ आहेत. मात्र तिथे जाणे थोडे महागडेही ठरते आणि त्यामुळे वारंवार नेल आर्ट करून घेणे आपल्या आवाक्याच्या बाहेरचे ठरते. यासाठी बाजारात आता नेल आर्ट मशिन उपलब्ध आहेत. हे नेल आर्ट मशिन दीड ते दोन हजार रुपयांपासून मिळते. 

  • नेलपेंटची एक छानशी शेड बोटांना लावून घ्या. रंग शक्यतो फिका असावा.
  • नेल आर्ट मशिनच्या पुढच्या बाजूला ठेवायला काही प्लेट्स मिळतात. यावर विविध छाप असतात. आपल्याला बोटांवर हव्या असलेल्या डिझाइनची प्लेट निवडा. 
  • प्लेटच्या त्या छापावर कॉन्ट्रास्ट रंगाचे नेलपेंट (शक्यतो गडद रंगाचे) लावा. 
  • आता मशिनचा मागे पुढे करायचा भाग पुढे न्या आणि त्या छापावर काही सेकंद दाबून धरा. 
  • लगेचच तो छाप माग आणत नखावर दाबून धरा. तुमच्या नखावर तो छाप पडल्याचे दिसेल.

बाजारात अशाही काही मशिन उपलब्ध आहेत, ज्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार कोणतीही डिझाइन ऑनलाइन सिलेक्ट करून ती संपूर्ण नखावर प्रिंट करून घेऊ शकतो. या मशिनमध्ये बेससाठी नखांना नेलपेंट लावण्याचीही गरज नसते.