esakal | किचन + : ऑम्लेट पॅनकेक रिंग
sakal

बोलून बातमी शोधा

Omlet-Pancake-Ring

उन्हाळा संपून पावसामुळे हवेत थोडा गारवा जाणवू लागला आहे. या दिवसांत पौष्टिक व परिपूर्ण आहार असलेली अंडी खाणे चांगलेच. मुलांना दररोज ऑम्लेट खायला आवडत नाही. त्याचे वेगवेगळे पदार्थ करून दिल्यास मात्र मुले खायला तयार होतात. मुलांना आवडणाऱ्या आकारांत ऑम्लेट सर्व्ह केल्यास त्यावर त्यांच्या  नक्कीच उड्या मारतील.

किचन + : ऑम्लेट पॅनकेक रिंग

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

उन्हाळा संपून पावसामुळे हवेत थोडा गारवा जाणवू लागला आहे. या दिवसांत पौष्टिक व परिपूर्ण आहार असलेली अंडी खाणे चांगलेच. मुलांना दररोज ऑम्लेट खायला आवडत नाही. त्याचे वेगवेगळे पदार्थ करून दिल्यास मात्र मुले खायला तयार होतात. मुलांना आवडणाऱ्या आकारांत ऑम्लेट सर्व्ह केल्यास त्यावर त्यांच्या  नक्कीच उड्या मारतील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तव्यावर बनवलेले, गोलाजवळ जाणाऱ्या आकाराचे ऑम्लेट मुलांना फारसे आकर्षित करत नाही. त्यामुळे ऑम्लेट पॅनकेक रिंग बाजारात उपलब्ध आहेत. नॉनस्टिक तवा तापवून त्यावर स्टेनलेस स्टिलचे हे आकार ठेवायचे. त्यात थोडे तेल सोडायचे आणि त्यामध्ये अंडे फेटून, त्यात चवीनुसार मीठ व मसाले घालून या आकारामध्ये ओतायचे. व्यवस्थित फ्राय झाल्यावर आकर्षक आकाराचे हे ऑम्लेट पॅनकेक मुलांना सर्व्ह करायचे. फक्त आकार बदलल्याने मुले या ऑम्लेटच्या प्रेमात पडतात आणि तुमचा त्यांना पौष्टिक खाऊ घालण्याचा उद्देशही सफल होतो.

वैशिष्ट्ये -

  • स्टेनस्टीलमध्ये आणि आकर्षक आकारात उपलब्ध. 
  • मोल्डच्या आतील भागाला ब्रशच्या मदतीने तेल लावल्यास अंडे चिकटत नाही. 
  • मुलांना आकर्षित करणाऱ्या विविध चार आकारांत उपलब्ध.
  • मोल्ड पुन्हा वापरताना धुऊन आणि कोरडा करून घ्यावा. साफ करण्यास सोपे. 
loading image