सेलिब्रिटी वीकएण्ड : घरीच राहणे आवडते.... 

प्रीतम कागणे, अभिनेत्री
Friday, 17 July 2020

वीकएण्ड म्हटले की, असते मजा आणि मस्ती. शाळेत असल्यापासूनच आपल्याला वीकएण्डची ओढ लागलेली असायची. कधी एकदाचे अभ्यासापासून आणि मोठे झाल्यावर कामापासून मुक्त होतोय, असे वाटते. आता धावपळीच्या जीवनात वीकएण्ड खूप महत्त्वाचा वाटतो. अभिनेत्री म्हणून काम करत असताना बऱ्याच वेळेस वीकएण्डची मजा घेता येत नाही. शुटिंगच्या तारखा मॅनेज करणे खूपच अवघड जाते.

वीकएण्ड म्हटले की, असते मजा आणि मस्ती. शाळेत असल्यापासूनच आपल्याला वीकएण्डची ओढ लागलेली असायची. कधी एकदाचे अभ्यासापासून आणि मोठे झाल्यावर कामापासून मुक्त होतोय, असे वाटते. आता धावपळीच्या जीवनात वीकएण्ड खूप महत्त्वाचा वाटतो. अभिनेत्री म्हणून काम करत असताना बऱ्याच वेळेस वीकएण्डची मजा घेता येत नाही. शुटिंगच्या तारखा मॅनेज करणे खूपच अवघड जाते. परंतु, वेळ मिळल्यावर मी खूप मजा करते. शनिवारची सकाळ मी मॉर्निंग वॉकने करते. नंतर थोडा वेळ वर्तमानपत्र वाचते. आईला नाश्‍ता बनविण्यासाठी मदत करते. आम्ही एकत्र बसून नाश्‍ता करतो. त्यानंतर लहान भाऊ अमोलसोबत दुपारी एखादा चित्रपट बघतो व त्या चित्रपटावर चर्चासुद्धा करतो. आम्ही दोघेही फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्याने मला अमोलबरोबर सिनेमे पाहायला आवडतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मैत्रिणीबरोबर संध्याकाळी शॉपिंगला जाण्यातही एक वेगळाच आनंद मिळतो. कुठल्या कंपनीची लिपस्टिक घ्यायची इथपासून सॅण्डलपर्यंतच्या खरेदीवर मैत्रिणीसोबत चर्चा करत व आइस्क्रीम खात शॉपिंग केव्हा होते, हे कळतच नाही. 

मला निसर्गात रमायलासुद्धा आवडते. ट्रेकिंगचीही खूप आवड आहे. मी महिन्यातून दोनदा माथेरानला निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला विसरायला जाते. माथेरान तसे जवळ आहे, म्हणून एका दिवसातही जाऊन परत येता येते. कुठे बाहेर गेले नाही, तर रविवारी घरीच सगळ्यांसोबत वेळ घालवणे पसंत करते. आईला तिने लावलेल्या बागेत मदत करते. कॅरम, बुद्धिबळ खेळत हसत-खेळत वेळ कसा जातो, ते कळतच नाही. परंतु, सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यातल्या बऱ्याच गोष्टी मी सध्या करू शकत नाही. ही साथ आटोक्यात आल्यावर पुन्हा या गोष्टी करण्याची आशा नवी उमेद देऊन जाते. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article pritam kagane