esakal | मी अभिनेत्री...
sakal

बोलून बातमी शोधा

Radhika-Deshpande

अभिनेत्री म्हटले की, ती मग्न होते दिलेली भूमिका रंगवण्याच्या, साकारण्याच्या, वठवण्याच्या प्रयत्नात! उत्तम अभिनेत्री दिलेली भूमिका गवसण्यासाठी स्वतःच्या अंतर्बाह्य मनात, शरीरात, हवे तसे, हवे तेव्हा, हवे तितके बदल करण्यास सज्ज असते. मात्र, हे सगळे करण्याआधी करावा लागतो ‘शोध’.

मी अभिनेत्री...

sakal_logo
By
राधिका देशपांडे

वुमनहूड -  रानी (राधिका देशपांडे)
अभिनेत्री म्हटले की, ती मग्न होते दिलेली भूमिका रंगवण्याच्या, साकारण्याच्या, वठवण्याच्या प्रयत्नात! उत्तम अभिनेत्री दिलेली भूमिका गवसण्यासाठी स्वतःच्या अंतर्बाह्य मनात, शरीरात, हवे तसे, हवे तेव्हा, हवे तितके बदल करण्यास सज्ज असते. मात्र, हे सगळे करण्याआधी करावा लागतो ‘शोध’.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शोध स्वतःचा...
शोध त्या भूमिकेचा...
शोध भविष्याचा...
आणि मग सुरू होते खरी दौड...
माझी ही दौड सुरू झालीय...
शोधत असते काहीतरी...
सापडत असते मला हवे ते...
कधी कधी निसटतेही...
पण शोध घेणे थांबत नाही...
मला थांबायचेच नाही...
मी भूतलावरील कुठल्या ठिकाणी?
कोण आहे मी?
आई? पत्नी? कलाकार? की फक्त एक अभिनेत्री...
का मी आहे एक सर्वसामान्य मुलगी...
मी शोधतेय...
मी हैराण आहे, मी बैचेन आहे,
मी खंबीर आहे, मी जिद्दी आहे...
कोण आहे मी?
माझा शोध सुरूच आहे...
शोधता-शोधता गवसतो मला माझ्यातला वाघ,
माझ्यातला माणूस आणि इतरांमधला देव!
शोध जो सतत सुरूच आहे...
धावत असते मी या शोधात अविरत...
सूर्याच्या दिशेने...अश्वमेधासारखी...
मिळते मला ऊर्जा, मिळते चेतना...
दिसतो हिमालय...अन् चंद्रही असतो जवळच...
अंधारलेल्या रात्री...सापडतो मग मला माझ्यातलाच तारा...शोधता शोधता
शोध सामान्याकडून असामान्याकडे नेणारा...
शोध एक मूलभूत गरज.
शोध...

असा माझा अविरत शोध सुरू असतो. मग आयुष्याच्या वाटेवरती मला देवमाणसे भेटतात. काही अविस्मरणीय अनुभव येतात, तर काही आयुष्याला वळण देतात. मग हे सगळे अनुभव कुठेतरी लिहून ठेवावेसे वाटतात आणि काही सांगावेसे वाटतात. एक कलाकार म्हणून जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कलात्मक आणि कलाटणी देणारा ठरतो का, याची उत्सुकता असते. त्यातूनच अनुभवांची शिदोरी मोठी होते. सोलो ट्रॅव्हल करताना अंतर्मुख करणारा प्रवास, प्राणी, निसर्ग यांच्याशी झालेला संवाद, नृत्य, नाट्य, संगीत, कला आणि क्रीडा या सगळ्यांचीच आवड असल्याने यात मी गोताखोरांसारखी डुबक्या मारत असते. ‘फुल ऑफ लाइफ’ असलेल्या माझ्या आयुष्यातले अनुभव तुमच्याशी शेअर करण्याचा घाट घालते आहे. वाचा आणि सांगा तुम्हाला अजून माझ्याकडून ऐकावेसे वाटते आहे का?

माझे घर
आपल्या घरात असतो आपण खास सजवलेला कोपरा. आपल्या भावभावनांशी जोडलेला. अशा कोपऱयांनी सजतं घर. शेअर करा हा कोपरा. सजवलेलं आपलं घर. फोटोंसह.

माझी रेसिपी
खायला आणि खाऊ घालायला तुम्हाला आवडतं का? मग शेअर करा तुमची आवडती रेसिपी...फोटोंसह...
व्हॉटस्ॲप- ९१३००८८४५९
email :  maitrin@esakal.com

loading image