esakal | मेमॉयर्स : मैत्रीण आणि मार्गदर्शकही!
sakal

बोलून बातमी शोधा

rashmi-anpat

खरेतर आई हीच माझी पहिली मैत्रीण आहे. माझ्या आयुष्यात कुठल्याही अडचणी असो, मग त्या पर्सनल असो की प्रोफेशनल, आईने मला प्रत्येकवेळी मार्गदर्शन केले. योग्य सल्ला दिला. त्यामुळे मी चांगला मार्ग आणि पर्याय निवडू शकले. त्यामुळेच माझी आई माझी चांगली मैत्रीण आहे. मी शाळेमध्ये असताना नाटक आणि कलाक्षेत्रात येण्यासाठी तिने मला प्रोत्साहन दिले.

मेमॉयर्स : मैत्रीण आणि मार्गदर्शकही!

sakal_logo
By
रश्मी अनपट, अभिनेत्री

खरेतर आई हीच माझी पहिली मैत्रीण आहे. माझ्या आयुष्यात कुठल्याही अडचणी असो, मग त्या पर्सनल असो की प्रोफेशनल, आईने मला प्रत्येकवेळी मार्गदर्शन केले. योग्य सल्ला दिला. त्यामुळे मी चांगला मार्ग आणि पर्याय निवडू शकले. त्यामुळेच माझी आई माझी चांगली मैत्रीण आहे. मी शाळेमध्ये असताना नाटक आणि कलाक्षेत्रात येण्यासाठी तिने मला प्रोत्साहन दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वेळोवेळी मार्गदर्शन केले. आज मी जे काही आहे, ते केवळ आई आणि बाबांमुळेच. त्यांनी मला भाषण आणि नाट्यवाचनासाठी बळ दिले.

त्यांच्यामुळेच मी अभिनय क्षेत्रात आले. त्यांनी यशाची वाट दाखवली. खरेतर आईसारखी गोड आणि समजूतदार मैत्रीण मला मिळाली. स्वतःच्या बुद्धीचा वापर कसा करायचा, हे तिनेच मला शिकवले. आयुष्यात यशस्वी होण्याबरोबरच एक चांगला माणूस होणे तितकेच गरजेचे आहे, हे तिने वेळीच सांगितले. माझ्या बहिणीने लंडनमध्ये राहून वैद्यकीय शिक्षण घेतले अन् ती डॉक्टर झाली, तर मी अभिनेत्री. त्यासाठी आई घर आणि ऑफिस सांभाळून प्रयत्न करत होती.

आमच्यात कोणते कलागुण आहेत, कोणत्या क्षेत्रात काम करायला आवडेल याचा तिने आम्ही लहान असतानाच शोध घेतला. तुम्ही निवडता ते क्षेत्र योग्य असून, त्यात तुम्ही जे काम कराल, त्यामध्ये १०० टक्के योगदान द्या, असा सल्लाही तिने आम्हाला दिला. हाच सल्ला ती आताही देते. त्यामुळे आम्ही दोघी बहिणी आज खूप आनंदी आहोत. आता मीही आई झाले आहे. त्यामुळे माझ्या अभिरचा सांभाळ मी आईचे प्रतिबिंब डोळ्यासमोर ठेवूनच करणार आहे. 
शब्दांकन - अरुण सुर्वे

loading image