esakal | मेमॉयर्स : आईनंच बनवलं ‘स्वयंसिद्धा’
sakal

बोलून बातमी शोधा

Rishina-Kandhari

कलागुणांना वाव मिळण्यासाठी माझी आई कल्पना अवस्थी हिनं मला लहानपणापासूनच प्रोत्साहन दिलं. मला प्रत्येक गोष्टीत परफेक्‍ट करण्यासाठी तिनं प्रयत्न केले. त्यामुळे लहानपणापासूनच शिक्षणाबरोबर इतर गोष्टीही तिनं मला शिकवल्या. घोडेस्वारी, स्केटिंग, स्वीमिंग, बॅडमिंटन, बास्केटबॉल, टेबल टेनिस या खेळांमध्ये मी अव्वलच होते. माझी आई स्विमर होती तसेच ती कवयित्री आणि रेकी ग्रँडमास्टरही आहे.

मेमॉयर्स : आईनंच बनवलं ‘स्वयंसिद्धा’

sakal_logo
By
रिशीना कंधारी, अभिनेत्री

कलागुणांना वाव मिळण्यासाठी माझी आई कल्पना अवस्थी हिनं मला लहानपणापासूनच प्रोत्साहन दिलं. मला प्रत्येक गोष्टीत परफेक्‍ट करण्यासाठी तिनं प्रयत्न केले. त्यामुळे लहानपणापासूनच शिक्षणाबरोबर इतर गोष्टीही तिनं मला शिकवल्या. घोडेस्वारी, स्केटिंग, स्वीमिंग, बॅडमिंटन, बास्केटबॉल, टेबल टेनिस या खेळांमध्ये मी अव्वलच होते. माझी आई स्विमर होती तसेच ती कवयित्री आणि रेकी ग्रँडमास्टरही आहे. तिनं अनेक चांगल्या कवितांचं लिखाणही केलं आहे. नवरात्रोत्सवानिमित्त तिनं ‘तुम अंबा हो अंबा’ ही स्वयंसिद्धाची उत्कृष्ट कविताही केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आईनं आम्हाला नेहमीच नवनवीन पुस्तकं वाचायला दिली. कारण, आपण चार लोकांमध्ये कोणत्याही गोष्टीची चर्चा करत असू, त्या वेळी आपल्यालाही चांगल्या पद्धतीनं बोलता आलं पाहिजे, हा तिचा उदात्त हेतू होता. आयुष्यात जे काही करायचं आहे, ते मनापासून करा आणि नेहमीच नवनवीन गोष्टी शिकत राहा, असा सल्ला ती नेहमीच देत असे. मला टीव्हीवर पहिला प्रोजेक्‍ट मिळाला, त्या वेळी ती माझ्याबरोबरच होती. काही सीन्सही ती मला समजावून सांगत असे. कारण, तिलाही नाटकांची खूप आवड होती. अनेक नाटकं ती पाहत असे. त्यामुळेच माझ्यामध्ये अभिनयाची गोडी निर्माण झाली. तिनंही शाळा, महाविद्यालयांमध्ये असताना विविध कार्यक्रमांमध्ये अभिनय केला. हीच जागरूकता माझ्यातही आली. आज मी अभिनयात आहे, ते केवळ आईमुळेच. 

‘दंगल टीव्ही’वरील ‘ऐ मेरे हमसफर’ हा शो मी करणार असल्याचं आईला सांगितलं. त्यात मला वेगळ्या लहेजामध्ये बोलायचं असल्याचं तिला सांगितलं, त्या वेळी तिनं माझ्यासाठी यू-ट्यूबवरून वेगवेगळे व्हिडिओ पाठविले. त्या माध्यमातून मी त्या भूमिकेत जिवंतपणा आणू शकीन, असा तिचा उद्देश होता. त्याचा मला इमर्तीच्या भूमिकेसाठी खूपच फायदा झाला आहे. विशेष म्हणजे, प्रेक्षकांनीही या भूमिकेसाठी मला खूप प्रतिसाद दिला. 

खरंतर ती माझी आई कमी अन् मैत्रीण जास्त आहे. तिला माझी सर्व सिक्रेट्स माहीत आहेत. आजपर्यंत मी एकही गोष्ट तिच्यापासून लपविलेली नाही. कधीकधी मी उदास असेन वा कधी ऑडिशन चांगली नाही झाली, तर ती नेहमीच मला प्रोत्साहन देते. आजचा दिवस विसर अन् उद्याचा विचार कर, असं ती नेहमीच सांगते. मी स्वयंपाकात निपुण आहे. कारण, स्वयंपाकाचे धडेही मी आईकडूनच घेतले आहेत. आजही माझ्या घरात मी स्वतःच स्वयंपाक बनविते. कलर पेंटिंग आदी प्रकारच्या कलाही मी आईकडूनच शिकले. तिनंच मला ऑलराउंडर बनवलं आहे. माझी आई जगामधली सर्वश्रेष्ठ आहे, याची अनुभूती मला पदोपदी होते. 
(शब्दांकन : अरुण सुर्वे) 

Edited By - Prashant Patil