esakal | फॅशन + : पांढऱ्या कुर्तीच्या ५ 'हटके' स्टाईल
sakal

बोलून बातमी शोधा

White-Kurti

फॅशनमधील काही ट्रेंड, स्टाईल किंवा कपड्याचा एखादा प्रकार कधीच जुना होत नाही. अशा फॅशनला आपण ‘एव्हरग्रीन’ म्हणतो. प्रत्येक मुलीच्या वॉडरोबमध्ये एक तरी पांढरा कुर्ता असतोच. याच कुर्त्यासोबत विविधप्रकारे स्टाइल करता येऊ शकते. रोजच्या फॅशनमध्ये थोडासा ट्विस्ट आणून पांढऱ्या कुर्त्यासोबत काही प्रयोग नक्कीच करता येतील. आज पांढरा कुर्ता कसा वेगवेगळ्या पाच प्रकारे घालता येऊ शकतो, हे पाहूयात.

फॅशन + : पांढऱ्या कुर्तीच्या ५ 'हटके' स्टाईल

sakal_logo
By
ऋतुजा कदम

फॅशनमधील काही ट्रेंड, स्टाईल किंवा कपड्याचा एखादा प्रकार कधीच जुना होत नाही. अशा फॅशनला आपण ‘एव्हरग्रीन’ म्हणतो. प्रत्येक मुलीच्या वॉडरोबमध्ये एक तरी पांढरा कुर्ता असतोच. याच कुर्त्यासोबत विविधप्रकारे स्टाइल करता येऊ शकते. रोजच्या फॅशनमध्ये थोडासा ट्विस्ट आणून पांढऱ्या कुर्त्यासोबत काही प्रयोग नक्कीच करता येतील. आज पांढरा कुर्ता कसा वेगवेगळ्या पाच प्रकारे घालता येऊ शकतो, हे पाहूयात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

1) कुर्ता आणि जिन्स 
पांढरा कुर्ता हा अगदी साधा असला, तरीही तो पूर्णपणे अनोखा लुक तुम्हाला देऊ शकतो. तो नेहमीच्या लेगिंन्सपेक्षा जिन्सवर ट्राय करा. शॉर्ट किंवा लॉंग दोन्ही प्रकारचे पांढरे कुर्ते निळ्या, आकाशी किंवा डार्क ब्लू जिन्सवर उठून दिसतील. सिव्हर आणि लांब झुमके अधिक शोभा वाढवतील. पायामध्ये अॅंकलेटसह फ्लॅट्स किंवा जुती घाला.

2) कुर्ता आणि पलाझो
पलाझो आता भारतीय फॅशनमध्ये चांगला रुळला आहे. पण, तरीही अनेक मुलींना पलाझोसोबत काय घालावे, असा प्रश्न पडतो. पांढऱ्या पलाझोवर पांढराच कुर्ता घाला. एखाद्या कार्यक्रमाला जायचे असल्यास त्यावर गडद रंगाची ओढणी घ्या. पलाझोला खाली घेर असल्याने हिल्स चांगले दिसतील. इतर दिवशी हे कॉम्बिनेशन करताना ओढणी न घेताही तुम्ही लुक कॅरी करु शकता. हा लुक पूर्ण करण्यासाठी फ्लॅट्स किंवा पॉमपॉमची चप्पल घाला.

3) कुर्ता आणि स्कर्ट
फॅशन इंडस्ट्रीमध्ये स्कर्टची फॅशनही वर्षानुवर्षे सुरू आहे आणि ती कधी जुनी होणार नाही. सतत काहीतरी नवीन त्यामध्ये येत असते. कोणत्याही रंगाच्या प्लेन पायघोळ स्कर्टवर पांढरा कुर्ता शोभून दिसेल. शराराप्रमाणे काहीसा हा लुक दिसेल. कॉलेज, ऑफिस किंवा अगदी कार्यक्रमासाठीही हा लुक वेगळेपण देईल. आवडीप्रमाणे कानातले आणि लांब गळ्यातले नक्की घाला.

4) कुर्ता विथ डेनिम
डेनिम फक्त जिन्सवर आणि टॉप्सवर घालता येते, असे नाही. सध्या डेनिम जॅकेटसोबत वेगवेगळे प्रयोग ट्रेंडमध्ये आहेत. प्लेन व्हाइट कुर्तावर डेनिम जॅकेट घाला. कुर्ता शॉर्ट असल्यास जीन्ससोबत कुर्ता आणि त्यावर डेनिम जॅकेट ट्राय करा. कुर्ता लांब आणि घेरदार असल्यास फक्त जॅकेट कॅरी करा. आजकाल ‘शोल्डर जॅकेट’चीही फॅशन आहे. अर्थात, जॅकेट फक्त खांद्यावर ठेवले जाते. कॉलेज, ऑफिस किंवा बाहेर फिरण्यासाठी हा लुक एक चांगला पर्याय आहे.

5) कुर्ता आणि स्कार्फ 
पांढरा कुर्ता प्लेन असल्याने तुम्ही कोणत्याही रंगाचा स्कार्फ यावर घालू शकता. पण, हा स्कार्फ ओढणीप्रमाणे न घेता फक्त गळ्याभोवती घ्या. अशा लुकसाठी तुम्ही काळी लेगिन्स, स्ट्रेंट पॅंट किंवा जीन्स घालू शकता. प्रवास, कॉलेज, ऑफिस, मिटिंगसाठी हा लुक उत्तम आहे. यावर मेसी बन, साधा बन, बेसिक मेकअप आणि लांब झुमके घाला त्यामुळे लुक पूर्ण होईल. मध्यंतरी बाजारात अॅनिमल प्रिंटचे स्कार्फ आले होते. ते वापरुनही एक अनोखा लुक करता येईल.