esakal | ग्रुमिंग + : नेल आर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Nail-Art

मुलींच्या रोजच्या फॅशनमधील एक अविभाज्य घटक म्हणजे नेलपेंट. कपड्यांप्रमाणे मॅचिंग नेलपेंट लावणे नवीन नाही. रोजच्या नेलपेंटवर प्रयोग करून त्याला अधिक फॅशनेबल करता येऊ शकते. नेल आर्टच्या साहाय्याने तुम्ही वेगवेगळे प्रयोग करू शकता. सोप्या पद्धतीने नेल आर्टची माहिती आणि त्याविषयी टिप्स... 

ग्रुमिंग + : नेल आर्ट

sakal_logo
By
ऋतुजा कदम

मुलींच्या रोजच्या फॅशनमधील एक अविभाज्य घटक म्हणजे नेलपेंट. कपड्यांप्रमाणे मॅचिंग नेलपेंट लावणे नवीन नाही. रोजच्या नेलपेंटवर प्रयोग करून त्याला अधिक फॅशनेबल करता येऊ शकते. नेल आर्टच्या साहाय्याने तुम्ही वेगवेगळे प्रयोग करू शकता. सोप्या पद्धतीने नेल आर्टची माहिती आणि त्याविषयी टिप्स... 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

1) नेल आर्ट म्हणजेच वेगवेगळ्या रंगांव्यतिरिक्त करण्यात येणारी डिझाइन, पॅटर्न किंवा कॉम्बिनेशन. अनेकांची नखे व्यवस्थित नसतात किंवा त्यांना योग्य वाढ नसते. त्याला पर्याय म्हणून Nail extension वापरले जातात. त्यावरही नेल आर्ट करता येते. 

2) नखांवर हे आर्ट करण्यासाठी सर्वप्रथम नखांवरील मूळ रंग पूर्णपणे घालवा. नेलपेंट नसले तरीही नेल रिमूव्हरने नखे साफ करा. नखांना नीट फाईलिंग करून आकार द्या.

3) नेल आर्टसाठी एक बेसिक कोट चांगल्या पद्धतीने द्या. जेणेकरून त्यावर इतर रंग आणि डिझाइन टिकून राहील. बेसिक कोटसाठी बाजारात प्रसिद्ध असलेले ब्रॅंड शक्यतो वापरा. त्यावर एक ट्रान्सपरन्ट नेलपेंटचा एक हलका कोट द्या. 

4) या कोटनंतर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डिझाइन आणि रंगसंगती करू शकता. बाजारात नेल आर्टसाठीचे स्टिकरर्सही उपलब्ध असतात. ते नसल्याच तुम्ही दुसऱ्या रंगाने स्वत: डिझाइन काढू शकता. यासाठी ग्लिटरचाही वापर करा. फुले, आकार, कार्टून असे अनेक प्रकार नखांवर करता येतील. कोणतीही डिझाइन केल्यावर त्यावर पुन्हा ट्रान्सपरन्ट नेलपेंटचा कोट द्यायला विसरू नका. 

5) नेल आर्ट करताना महत्त्वाचे म्हणजे रंगांचे कॉम्बिनेशन. रंग निवडताना काळजी घ्या. नखांच्या बेसचा रंग गडद असल्यास डिझाइनचा रंग हा हलका असावा. तेव्हाच हे आर्ट उठून दिसेल. 

loading image