esakal | फॅशन + : कार्डिगन : मॉन्सूनमधील हटके स्टाइल
sakal

बोलून बातमी शोधा

Style

तीव्र उन्हाळा संपून आता सुखावणाऱ्या पावसाला सुरुवात झाली आहे. जून महिना म्हणजे उन्हाळ्याची सुटी संपून शाळा, कॉलेज यांची लगबग आणि नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात असते. (कोरोनामुळे हे वर्ष अपवाद)! एकीकडे पाऊस, गारेगार वातावरण, भिजण्याची चिंता आणि या सर्वांत प्रश्न पडतो तो फॅशनचा.

फॅशन + : कार्डिगन : मॉन्सूनमधील हटके स्टाइल

sakal_logo
By
ऋतुजा कदम

तीव्र उन्हाळा संपून आता सुखावणाऱ्या पावसाला सुरुवात झाली आहे. जून महिना म्हणजे उन्हाळ्याची सुटी संपून शाळा, कॉलेज यांची लगबग आणि नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात असते. (कोरोनामुळे हे वर्ष अपवाद)! एकीकडे पाऊस, गारेगार वातावरण, भिजण्याची चिंता आणि या सर्वांत प्रश्न पडतो तो फॅशनचा. मॉन्सूनमध्ये फॅशन करताना थोडी काळजी घ्यावीच लागते, पण या वेळी काही हटके स्टाइल करण्यास काय हरकत आहे? या मॉन्सूनमध्ये काहीतरी हटके करा. जाणून घ्या कार्डिगनसोबत करायची फॅशन ! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कार्डिगन म्हणजे काय?
कार्डिगन हे प्रत्येक मुलीच्या वॉडरोबमध्ये असणे आवश्यक आहे. कार्डिगन हा विणलेल्या स्वेटरचा एक प्रकार आहे. पण, स्वेटर आपण फक्त थंडीमध्ये घालतो. कार्डिगन याला अपवाद आहे. त्याचे कापड हलके असून, दररोज घालता येऊ शकते. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कार्डिगन हे आकाराने गुडघ्यापर्यंत लांब असून, त्याला बटणे नसतात. त्यामुळे एखाद्या जॅकेटप्रमाणे तुम्ही त्याला कॅरी करू शकता. जिन्स, प्लेन टॉप आणि त्यासोबत कार्डिगन घाला. तुमचा रोजचा लुक कार्डिगनमुळे हटके दिसेल.

1) पावसाळ्यात थोडासा गारवा हा असतोच. अशा वेळी ऑफिसमध्ये, एसीमध्ये थंडीपासून बचाव करण्यासाठी कार्डिगन उत्तम पर्याय आहे. 

2) कार्डिगनमध्ये रंगांची भरपूर व्हरायटी असल्याने चिंता नाही. बोरिंग जुन्या कपड्यांसोबत घालून नवा लूक करता येईल. 

3) स्लिवलेस टॉप कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये घालता येत नाही. अशा टॉप्सवर कार्डिगन घालून स्टाइल करा. 

4) याचा गळा मोठा असल्याने तुमचा टॉपही दिसतो आणि स्टाइल लपत नाही.

5) वेळ कमी असताना, गडबडीच्या वेळी काय घालावे सुचत नाही. कोणत्याही प्लेन टॉप आणि नेहमीच्या जीन्सवर कार्डिगन घाला आणि तुमचा प्रश्‍न मिटेल. 

6) कार्डिगनसोबत ओवरसाईज बॅग, मोकळे केस, गळ्यात नाजूक चेन आणि पायात फ्लॅट्स घालून एक स्मार्ट लुक करता येईल.