Women's Day : चार पावलं...

Women
Women

‘मी दिलंय ना तिला स्वातंत्र्य...घरी नाही बसवून ठेवलेलं...’
‘आमची ही घरीच असते...जा म्हटलेलं तिला जॉबला...नाही गेली...’
‘आमच्या ह्यांनी कायम मुलांना मोकळीक दिली...’
‘च्यायला...तुला सांगतो, बॉसनं ऑफिसमध्ये असं छळलं बघ...’
‘ए माxxxxx, अंगावर घालतो का गाडी...?’
‘विराटनं आx xxx, नाहीतर जिंकलोच असतो आपण...’

रिकामटेकड्या कट्ट्यावरच्या, कुटुंबातल्या, रस्त्यावरच्या, ऑफिसमधल्या, कार्यक्रमातल्या अशा कुठल्याही गप्पांमध्ये...
वृद्ध, ज्येष्ठ, मध्यमवयीन, तरुण, शाळकरी मुलं अशा कुठल्याही वयोगटामध्ये...
पहाट, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र अशा कुठल्याही प्रहरामध्ये...
तुमच्या-आमच्या बोलण्यात ‘ती’ असते...! 

महिलांविषयीचे आणखी विषय वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

तुमच्या-आमच्या कृतीत ‘ती’ असते का, तपासून बघायला पाहिजे. 
आयुष्यात ‘ती’ नाही, असा पुरुष अजूनतरी वैज्ञानिकदृष्ट्या अशक्‍य. निम्मं जग व्यापलंय तिनं. तरीही तिला ‘ती’ची हक्काची जागा मिळालीय का...? समाजातली परिस्थिती, आकडेवारी, भोवतालची मानसिकता तसं काही सांगत नाही. ‘ती’ची जागा कधीपासूनची बळकावून बसलयेत सगळे. हा काही कट्टर फेमिनिस्ट दृष्टिकोन नव्हे. साधा-सोपा विचार आहे. तुम्ही-आम्ही कधीतरी निवांत बसून करायलाच हवा, असा. ‘मी दिलं’ म्हणून ‘तिला मिळालं’ ही सुप्त दात्याची भावना बाजूला ठेवून पाहण्याचा प्रयत्न करायला हवा. मग, खऱ्या समानतेकडं आपलं पहिलं पाऊल पडेल.
हे वाटतं, तितकं सोपं नाहीय. 

‘तिचे’ निर्णय तिला घेऊ देणं आणि ते निर्णय घेता येईल, अशी इकोसिस्टम राखणं इतकंच काम तुम्हाला-आम्हाला करायचं आहे. म्हणजे, ‘तिनं’ जॉब करावा की न करावा, हा निर्णय तिला घेऊद्या. शिक्षणाचं स्वातंत्र्य असणारी इकोसिस्टिम तेवढी तयार करा. 

महिलांसाठीच्या विविध कोर्सेसची माहिती घेण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘तिचा’ सन्मान झाला पाहिजे, असं वाटतंय, तर मग आधी तोंडाला सवय लावा. उठता-बसता उद्धारासाठी आणि उदाहरणांसाठी ‘ती’चा वापर टाळा. शिवीमधून ‘तिला’ आधी हद्दपार करा. 

चौकट ओलांडून बाहेर पडणाऱ्या ‘तिचं’ कौतुक मनात असूद्याच; त्याचवेळी जी घरी आहे, ‘ति’लाही बरोबरीचच स्थान द्यायला विसरू नका. ‘ति’ला बाहेर आणि घरातही तितकाच आत्मविश्वास राहील, हे पाहणं अगदीच अवघड नाही. 

आणि हो, ‘तिच्या’ स्वातंत्र्यावर घाला घालणारी दुसरी ‘ति’च असू शकते. आई, सासू, बहिणी, मैत्रीण, शत्रू, ओळखी-अनोळखी अशा कोणत्याही रूपात. कारण, ‘तिच्या’वर तिच्याच परंपरांचं शेकडो वर्षांचं जोखड आहे. आपण काही अन्याय करतोय, ही भावनाच मुळी ‘ती’च्या मनात येत नाही, इतकं हे जोखड घट्ट आहे. ते दूर करायला मदत करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com