डेली सोप : बिग बॉस आणि एक्झिट!

संदेश मुळीक
Sunday, 16 February 2020

ड्रामा, भांडण आणि मनोरंजन नसल्यास टीव्हीवरचा कोणताही रिॲलिटी शो पाहायला रस येत नाही. ऋतूनुसार बदलत्या स्वभावावर हसल्याशिवाय आपला दिवस पूर्ण होत नाही. हे सगळं मालिकांमध्ये बघायला मिळतंच, पण त्यात अधिकचा मिरची आणि मसाला ओतून ते सादर करण्याची कला बहुचर्चित शो ‘बिग बॉस’इतकी कुठल्याच शोमध्ये दिसणार नाही. एका घरात रोज आपापसातील भांडण, द्वेष सोडवण्यातच सेलिब्रिटींचा पूर्ण वेळ जातो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एकूण तेरा सीझन्समधल्या या शृंखलेने दरवर्षी टीआरपीचे सगळे रेकॉर्ड तोडले आहेत, पण आता सुरू असणाऱ्या तेराव्या सीझनमध्ये तशी धमक शेवटपर्यंत फारशी दिसलीच नाही. इतर सीझनपेक्षा पाच आठवड्यांनी वाढवण्यात आलेला या सीझनचा कालावधी प्रेक्षकांसाठी असह्य होता, त्याच्या टीआरपीमध्ये कमालीची घसरण झाली होती. त्यात भर म्हणून यावर्षी तब्बल ८ जणांना वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळाली आहे. दरवर्षी फक्त सेलिब्रिटी शोमध्ये अशी एन्ट्री दिली जायची, आता त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शोमध्ये बोलावून घेतले गेले आहे. त्यामुळे वाद आणि ट्विस्ट वाढले आहेत, मात्र त्यांचा हा ‘मेळावा’ पाहणाऱ्यांच्या पचनी पडताना दिसत नाही.

गंमत म्हणजे, प्रेक्षकांनी ज्या शोसाठी वर्षभर वाट पाहिली, तोच शो आता कधी बंद होईल, याची वाट पाहण्याची वेळ प्रेक्षकांवर आली आहे! तणाव आणि आरडाओरडा हेच सूत्र असणाऱ्या या शोमध्ये त्याच गोष्टींचा अतिरेक झाल्याने ते पाहण्यात काही अर्थ नाही, अशा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आहेत. सध्या ‘बिग बॉस’च्या घरात रश्मी देसाई, सिद्धार्थ शुक्ला, शेहनाज कौर गिल, पारस छाब्रा, असीम रियाझ आणि आरती सिंग सहा फायनलिस्ट ठरले आहेत. आता अखेरीस हा शो शेवटाकडे वळला असून, हा लेख प्रसिद्ध होईल तेव्हा या सिझनचा निकाल लागलेला असेल.. पाहू या, कोण होतेय बिग बॉस...

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article sandehs mulik on Big boss and exit