ग्रुमिंग : वॅक्सिंगला एपिलेटरचा पर्याय

waxing-epilator
waxing-epilator

तुम्हाला काही महत्त्वाचा सोहळा किंवा पार्टी फंक्शनसाठी मेक-अप करावाच लागतो. त्याबरोबर फेशिअल, हेअर आणि स्किन ट्रीटमेंटही केल्या जातात. मात्र, या सगळ्यांत सर्वाधिक त्रासदायक ठरते वॅक्सिंग. त्वचेवरील नको असणारे केस काढण्याची प्रक्रिया महिलांच्या दृष्टिने खूप वेदनादायी असते. वॅक्सिंग करायचे नसल्यास अनेकदा रेझरचा वापर केला जातो. या डोकेदुखीवरचा उपाय आहे ''एपिलेटर’. त्वचेवरील नको असणारे केस मुळासहित घालवण्यासाठी वापरला जाणारा सर्वोत्तम पर्याय. ट्रिमरसारखा हा एपिलेटर वापरण्यास अगदी सोपा आहे आणि वेळही खूप कमी लागतो. त्यामुळे बाकी हेअर रिमुव्हल ट्रीटमेंटपेक्षा एपिलेटर वापरण्याकडे महिलांची कल अधिक आहे.

कसे वापराल?
1) सहसा एपिलेटर वापरण्यासाठी त्वचा साफ असावी, त्यासाठी आधी हातपाय धुवून घेणे गरजेचे आहे.
2) सुरुवातीस वापरताना कमीत कमी अंतर ठेवा, त्यामुळे त्यात नेमकेपणा येऊन सर्व केस निघून जातील.
3) शॉवर घेताना किंवा वाहत्या पाण्यात एपिलेटर वापरावे, पण ते वॉटरप्रूफ असावे. यामुळे त्वचा कोरडी पडणे किंवा एपिलेटरच्या ब्लेडमुळे त्वचेला दुखापत होत नाही.
4) एपिलेटर वापरताना ९० डिग्री अँगलचा विचार करून पकडावा व केसांच्या दिशेने वापरावा ज्यामुळे अधिकाधिक केस निघतात.
5) एपिलेटर वापरून झाल्यानंतर त्वचा कोरडी न पडण्यासाठी बॉडी लोशन लावावे.
6) जास्त फोर्स वापरून एपिलाईट करू नका. तसे केल्यास त्वचा लाल होऊन रॅशेस येऊ शकतात.
7) पाण्याचा वापर न करता एपिलेटर वापरत असाल, तर आधी टाल्कम पावडर वापरावी. त्यामुळे त्वचा मुलायम राहण्यास मदत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com