ग्रुमिंग + : मॅनिक्युअर आणि पेडीक्युअर किट

manicure and pedicure kit
manicure and pedicure kit

महिलांची एखादा कार्यक्रम किंवा पार्टी फंक्शनची पाहिली तयारी म्हणजे ब्युटी पार्लरमध्ये अपॉइंटमेंट घेणे आणि बजेट काढून काय ट्रीटमेंट करायच्या आहेत, हे ठरवणे. आजकाल फेस पॅक आणि फेशिअल ट्रीटमेंटचे किट सहजपणे उपलब्ध होते, त्यामुळे त्यासाठी बाहेर जाऊन मेक-अप करण्याची गरज पडतेच, असे नाही. आता राहतो तो फक्त मॅनिक्युअर आणि पेडीक्युअरचा विषय. त्यासाठी पार्लरमध्ये जाणे भागच होते, पण आता त्याचीही गरज नाही. ही ट्रीटमेंट घरी, स्वतःहून करण्यासाठी मेनिक्योर आणि पेडीक्योर किट उपलब्ध झाले आहे. त्यामुळे घरच्या घरी, कमी वेळेत आपण आपल्या नखांचे रूप बदलू शकतो. त्या किटमध्ये नेल कटर, क्युटिकल पुशर, नेल बफर, नेल ब्रश, नेल फाईल, माईल्ड स्क्रब या टूल्सचा समावेश असतो.

1) नेल कटर 
आपल्या वापरातील नेल कटरमुळे वाढलेली नखे कमी करता येतील. अनेकदा नखे वेडीवाकडी तुटलेली असतात, नेल कटरने ती योग्य आकारात आणता येतात. 

2) क्युटिकल पुशर
हे टूल मॅनिक्युअर करताना नखे आणि आपल्या स्किनमध्ये अंतर ठेवण्याचे काम करते. नखांवर प्रक्रिया करताना स्किनमध्ये येणार नाही. तुमची स्किन हार्ड असल्यास स्टीलचा क्युटिकल पुशर वापरावा आणि स्किन सॉफ्ट असल्यास लाकडी वापरला, तरी चालेल.

3) क्युटिकल निपर 
याचा वापर मोठ्या नखांसाठी तसेच नखांभोवती असणारी ड्राय स्किन काढण्यासाठी होतो. त्याबरोबरच नखांना लागून असणारे नकोसे सॉफ्ट टिश्यू काढण्यासाठी याचा उपयोग होतो. हे टूल वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतर साफ करायचे विसरू नका आणि वापरानंतर हॅण्ड क्रीम किंवा लोशन कोरडेपणा कमी करण्यास मदत करेल.

4) नेल बफर
नेल बफरच्या मदतीने नखांवर एक वेगळीच शाइन येऊन ते थोडे स्मूथ होण्यास मदत होते. नखांची डेड स्किन काढून चमक निर्माण करते. मात्र, याचा वापर महिन्यातून एकदा योग्य आहे. अतिवापर केल्याने नखांना अपाय होऊ शकतो. नेल बफर वापरल्यानंतर बी वॅक्स किंवा क्युटिकल ऑईलचा वापर करावा.

5) नेल फाइल 
नेल फाइलद्वारे आपण नखांच्या कडांना हवा तसा आकार देऊ शकतो. नेल फाईल वापरण्यापूर्वी नखे ड्राय असायला हवी अशी काळजी घ्या. याचा वापर एकाच दिशेने व कमी प्रेशर वापरून करावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com